शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
4
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
5
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
6
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
7
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
8
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
9
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
10
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
11
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
12
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
13
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
14
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
15
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
16
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
17
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
18
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
19
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
20
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
Daily Top 2Weekly Top 5

नीरा-देवघरचे पाणी चुकीच्या पद्धतीने बारामतीला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:39 IST

फलटण : ‘नीरा-देवघर कालव्याची कामे होण्याबाबत व कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पाबाबत राज्य शासन उदासीन असल्याने हे प्रकल्प रखडले आहे. तसेच ...

फलटण : ‘नीरा-देवघर कालव्याची कामे होण्याबाबत व कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पाबाबत राज्य शासन उदासीन असल्याने हे प्रकल्प रखडले आहे. तसेच नीरा-देवघरचे पाणी चुकीच्या पद्धतीने बारामतीला नेले जात आहे,’ अशी नाराजी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी व्यक्त केली.

गिरवी, ता. फलटण येथे दिगंबर आगवणे यांच्या निवासस्थानी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी मोहिते-पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

मोहिते-पाटील म्हणाले, ‘मी उपमुख्यमंत्री असताना मंजूर केलेला कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्प पूर्ण करण्याबाबत केंद्र सरकार अनुकूल असून, राज्य सरकार मात्र उदासीन आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांनी तातडीने कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पास मंजुरी दिलेली होती. परंतु विद्यमान महाविकास आघाडीच्या सरकारने कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पास निधी न देऊन उदासीनता दाखवलेली आहे. आगामी काळामध्ये कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्प पूर्ण होणे गरजेचे आहे. त्यासाठी कोणत्याही प्रकारचा संघर्ष करावा लागला तरी आम्ही तयार आहोत.’

फलटण व माळशिरस तालुक्यांचा दुष्काळ दूर करणारा आणि गेल्या बर्‍याच वर्षांपासून रखडलेला नीरा-देवधर प्रकल्पाला निधी देण्यात राज्य सरकारला अपयश आले आहे. हा महत्त्वाचा प्रकल्प आगामी काळात लवकर होणे गरजेचे आहे. पूर्वीप्रमाणे कालवे न होता, आता बंदिस्त पाईपलाइनद्वारे नीरा-देवधर प्रकल्पाचे काम होणार आहे. याचे पाणी बारामतीला कारण नसताना नेले जात असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. केंद्र सरकार अर्धवट प्रकल्पांना निधी देऊ शकत नाही नीरा-देवधर व कृष्णा -भीमा स्थिरीकरण प्रकल्प होणेबाबत केंद्र सरकार पातळीवरही आम्ही प्रयत्न केलेले आहेत. पाणी प्रश्न सुटावा म्हणूणच आम्ही भाजप प्रवेश केला होता. केंद्राची सहकार्याची भूमिका आहे; परंतु केंद्र सरकार हे अर्धवट राहिलेल्या प्रकल्पांना निधी देऊ शकत नाही. त्यामुळे आगामी काळात या प्रकल्पांना राज्य सरकारकडून निधी मिळणे गरजेचे आहे. पाणी प्रश्नांमध्ये राज्य सरकारने राजकारण आणू नये तसेच जनता अडचणीत असताना वीजबिले भरली नाही म्हणून त्यांची वीज पुरवठा खंडित करण्याचा चुकीचा प्रकार सुरू असल्याबद्दल मोहिते पाटील यांनी नाराजी व्यक्त केली.

(चौकट)

वीज मंडळाला टाळे ठोकणार : आगवणे

लाईट बिल भरले नाहीत म्हणून वीज मंडळ गोरगरिबांचे वीजपुरठा खंडित करत असून, शेतकऱ्यांचे ट्रान्सफॉर्मवरीलही कनेक्शन कट केले जात आहे. महावितरणने जनतेला दिलासा द्यावा, कोणाचेही वीजपुरवठा खंडित करू नये, अन्यथा येथील वीजवितरण कार्यालयात टाळे ठोकण्याचा इशारा दिगंबर आगवणे यांनी यावेळी दिला.