शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

आसनगाव परिसरात पाणी पातळीत घट

By admin | Updated: February 8, 2016 23:24 IST

विहिरी आटल्या : नगदी पिके धोक्यात आल्याने शेतकरी चिंतेत

शेंद्रे : सातारा शहरापासून १५ ते २० किलोमीटरवर असणाऱ्या आसनगाव परिसरात चालू वर्षी चांगला पाऊस न झाल्यामुळे परिसरातील विहिरींचे पाणी मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. तसेच अनेक ठिकाणी तर विहिरी आटल्याचे चित्र दिसून येत आहे. शेतकऱ्यांच्या विहिरीवरील पाण्याच्या मोटारी दिवसात १० ते १५ मिनिटेच चालत आहेत.त्यामुळे या परिसरातील विहिरींवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांची शेतातील पिके धोक्यात आली आहेत. ऊस, आले तसेच इतर पालेभाज्यांसाठी शेतकऱ्याला जादा पाण्याची आवश्यकता असते. परंतु विहिरींमध्ये पाणी नसल्यामुळे आसनगाव परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त झालेला दिसून येत आहे.चालू हंगामात शेतकऱ्यांचे ऊस कारखान्याला तोडून जात आहेत. परंतु येथून पुढे उन्हाळ्यात उसाला व इतर पिकाला पाणी कोढून आणणार या भीतीने शेतकरी आडसाली उस न ठेवता उस पीक शेतातून काढत आहेत. त्यामुळे साखर कारखानाजवळ असूनही या परिसरातील उस पिकाचे प्रमाण कमी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. यावर प्रतिक्रिया विचारली असता मापरवाडी येथील युवा शेतकरी अधिक बाबर म्हणाले, ‘गेल्या वर्षी पावसाचे प्रमाण खूपच कमी झाल्यामुळे विहिरीमधील पाण्याची पातळी फेब्रुवारी महिन्यातच संपली आहे. विहिरींमध्ये पाण्याचे प्रमाण खूपच कमी असल्यामुळे शेतातील पिके धोक्यात आली आहेत. शेतातील पिके वाळू लागली आहेत. (वार्ताहर)