शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

वाईत भरदिवसा पाच लाख लांबविले

By admin | Updated: March 17, 2016 23:36 IST

बँकेच्या जिन्यातील प्रकार : सोसायटीच्या वयोवृद्ध सचिवाची पिशवी हिसकावून पोबारा

वाई : येथील भाजी मंडईसारख्या गजबजलेल्या ठिकाणी सुमारे ५ लाख १२ हजारांची रोकड असलेली पिशवी हिसकावून चोरट्याने पोबारा केला. एका सोसायटीत असलेल्या वीजबिल भरणा केंद्रात जमा झालेली रोकड संस्थेचा वयोवृद्ध सचिव बँकेत भरण्यासाठी घेऊन गेला असता बँकेच्या जिन्यातच ही घटना घडली.वाई को-आॅपरेटिव्ह कंझ्युमर सोसायटीत वीजबिलाचा भरणा करण्याचे केंद्र आहे. तेथे जमा होणारी रोकड रोजच्या रोज बँकेत भरलीजाते. गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास सोसायटीचे सचिव प्रभाकर रघुनाथ जोशी (वय ८४, रा. रविवार पेठ, वाई) हे ५ लाख ११ हजार ८२० रुपयांची रोकड घेऊन बँक आॅफ महाराष्ट्रच्या शाखेत भरणा करण्यासाठी गेले होते. त्यांच्या हातात पैशांची पिशवी होती. चोरट्याने ही पिशवी हिसका देऊन ओढून घेतली आणि पैशांसह पोबारा केला़, अशी फिर्याद जोशी यांनी दिली आहे़वाई पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, गुरूवारी सकाळी अकरा वाजता प्रभाकर जोशी हे मंडईजवळ असलेल्या बँक आॅफ महाराष्ट्रच्या शाखेत बिलाच्या रकमेचा भरणा करण्यासाठी गेले होते. बँकेच्या जिन्यावरच चोरट्याने हातातील पैशांच्या पिशवीला हिसका दिला आणि गर्दीचा फायदा घेत पळून जाण्यात चोरटा यशस्वी झाला़ दरम्यान, जोशी यांनी ‘चोर-चोर’ म्हणत पाठलाग केला; परंतु चोरट्याचा साथीदार किसन वीर चौकाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर दुचाकी घेऊन तयारीत उभा होता. चोरटा दुचाकीवर बसल्यानंतर दोघे सुसाट पळून गेले. चोरट्यांचा छडा लावण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज हा एकमेव पर्याय उपलब्ध असून, त्याची तपासणी सुरू आहे़ पोलिस निरीक्षक रमेश गंलाडे तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)