वडूथला कायमस्वरूपी मंडलाधिकाऱ्यांची नियुक्ती

By Admin | Updated: July 3, 2014 00:48 IST2014-07-03T00:44:35+5:302014-07-03T00:48:30+5:30

‘लोकमत’च्या वृत्तानंतर प्रशासनाचा निर्णय

Wadut appointed permanent boarders | वडूथला कायमस्वरूपी मंडलाधिकाऱ्यांची नियुक्ती

वडूथला कायमस्वरूपी मंडलाधिकाऱ्यांची नियुक्ती

शिवथर : वडूथ, ता. सातारा येथे कायमस्वरूपी मंडलाधिकारी नसल्यामुळे शेतकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे आणि लोकांच्या अनेक दिवसांपासून वारस नोंदी तसेच दस्तऐवज नोंदी रखडल्या आहेत, याची दखल घेऊन प्रशासनाने वडूथ मंडलला नव्याने कायमस्वरूपी मंडलाधिकारी दिल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, ‘लोकमत’चे आभार मानले जात आहेत.
कायमस्वरूपी मंडलाधिकारी नसल्यामुळे सर्वसामान्य शेतकरी चक्रव्यूहात अडकला होता. वडूथ येथे परिसरातील शेतकऱ्यांसाठी मंडलाधिकारी कार्यालय आहे. परंतु या कार्यालयसाठी तात्पुरत्या स्वरूपात अथवा सहा महिने किंवा एक वर्ष राहिलेल्याच मंडलाधिकाऱ्याची नियुक्ती केली जात होती. त्यामुळे बरेच प्रश्न प्रलंबित राहिले होते. या त्रासामुळे शेतकऱ्यांची कोणतीही कामे वेळेवर होत नव्हती. त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी संतापला होता. त्यांना कायमस्वरूपी वरिष्ठ अधिकाऱ्यांना विनंती करून वडूथ मंडलसाठी कायमस्वरूपी मंडलाधिकारी मिळाल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. (वार्ताहर)

Web Title: Wadut appointed permanent boarders