शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

गणवेशाचे जादा अनुदान लवकरच शाळांमध्ये !

By admin | Updated: July 17, 2014 23:17 IST

प्रशासन सतर्क : पटसंख्येनुसारच शासनाकडून अनुदान

ढेबेवाडी : तालुक्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या गणवेशाचे जादा अनुदान लवकरच जमा होणार असल्यामुळे हा प्रश्न निकाली निघणार आहे. शाळा सुरू होऊन एक महिना उलटला. विद्यार्थ्यांच्या मोफत गणवेश योजनेची रक्कम कधी येणार, याकडे शिक्षकांचे लक्ष लागून राहिले होते. दरम्यान, अनेक शाळांना विद्यार्थीसंख्येएवढी गणवेशाची रक्कम कधी प्राप्त होणार, याची प्रतीक्षा लागून राहिली होती. तसेच या योजनेचे निकष बदलून चालू वर्षी दाखल झालेल्या विद्यार्थी संंख्येवरच गणवेशाची रक्कम मिळावी, अशी मागणी शिक्षक-पालकांमधून केली गेली होती.जिल्हा परिषदेच्या प्रथमिक शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थी-विद्यार्थिनींना तसेच सर्वसाधारण वर्गातील मुलींना शिक्षण विभागाकडून मोफत गणवेश वितरित करण्यात येतात़ मात्र, त्यामध्ये अडचणी निर्माण होऊ लागल्याने शासनाने आता रक्कम देण्यास सुरुवात केली.गणवेशाची रक्कम देताना शिक्षण विभागकडून काही निकष लावले जातात त्यामध्ये गतवर्षी सप्टेंबर महिन्यात शाळेत असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या निश्चित केली जाते़ तसा अहवाल शिक्षण विभागाकडे दिल्यानंतर त्यावेळच्या संख्येनुसार शाळा व्यवस्थापन समितीकडे रक्कम वर्ग केली जाते़ मात्र जून महिन्यात या विद्यार्थीपटामध्ये मोठी अदलाबदल होते. काही शाळांमध्ये नव्याने विद्यार्थी दाखल होतात तर काही शाळांमधून विद्यार्थी स्थलांतरित होतात़एका गणवेशासाठी दोनशे रुपये याप्रमाणे शासनाकडून शाळा व्यवस्थापन समित्यांच्या खात्यावर बँकेत अनुदान जमा झाले आहे़ हे अनुदान जमा झाल्याने शिक्षकांचा जीव भांड्यात पडला; पण नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे काय? त्यांना शासन निर्णयानुसार गणवेश देणे बंधनकारक असल्याने त्यांना गणवेश कुठून द्यायचा. असा प्रश्न शिक्षकांसमोर निर्माण झाला होता.दरम्यान, या योजनेअंतर्गत नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थीसंख्येवरच हे अनुदान दिल्यास बरे होईल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला़ (वार्ताहर)