शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

Corona Cases In Satara : व्हेंटीलेटर बेडअभावी युवकाचा दुर्दैवी मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 15:49 IST

Corona Cases In Satara : व्हेंटीलेटर बेड न मिळाल्याने एका युवकाचा दुर्देवी मृत्यु झाला. मल्हारपेठ विभागातील गावात ही घटना घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून कोरोना मृत्युचे प्रमाण वाढल्यामुळे ग्रामस्थांत धास्ती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देव्हेंटीलेटर बेडअभावी युवकाचा दुर्दैवी मृत्यू मल्हारपेठविभाग हादरला : मृत्युशी झुंज ठरली अपयशी

मल्हारपेठ : व्हेंटीलेटर बेड न मिळाल्याने एका युवकाचा दुर्देवी मृत्यु झाला. मल्हारपेठ विभागातील गावात ही घटना घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून कोरोना मृत्युचे प्रमाण वाढल्यामुळे ग्रामस्थांत धास्ती निर्माण झाली आहे.ऐन तारुण्यात एका युवकाचा दुर्दैवी अंत झाला. अपुर्ण सुविधांमुळे अजून किती जणांचा जीव जाणार? असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत. जिल्ह्यात कोरोनाची वाढती संख्या व मृत्युचा कहर वाढत चालला आहे. यात पहिल्या लाटेत वयोवृद्ध नागरिकंना कोरोनाने लक्ष केले होते. मात्र दुसऱ्या लाटेचा विचार करता लहान बालकांपासुन ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच कोरोनाने घेरले असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कोरोनाची दाहकता पाहता सर्वजण दहशतीच्या छायेखाली दिसत आहे.मल्हारपेठ विभागातील एका गावातील युवकाला आठ दिवसांपुर्वी कोरोनाची लागण झाली होती. सुरूवातीला त्याला सौम्य लक्षणे जाणवत होती. त्यामुळे त्याने कोरोना चाचणी केली. त्यावेळी त्याचा अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाला. लक्षणे तिव्र नसल्यामुळे घरीच त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते. त्यानंतर दोन दिवसांपुर्वी रात्री अचानक त्याला दम लागण्यास सुरूवात झाली.

त्यामुळे काही युवकांनी त्याला पाटण येथील कोविड हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट केले. मात्र, मध्यरात्री त्याला श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. त्यामुळे डॉक्टरांनी त्याला आॅक्सिजन लावला. तसेच संबंधित युवकाला व्हेंटीलेटर बेडची आवश्यकता असल्यामुळे नातेवाईकांना त्याबाबत सांगण्यात आले.

नातेवाईक तसेच मित्रांनी सातारा, कऱ्हाडमध्ये व्हेंटीलेटर बेड मिळविण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, कोठेही बेड उपलब्ध झाला नाही. अखेर दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता व्हेंटीलेटर बेडअभावी त्या तरूणचा दुर्दैवी मृत्यु झाला.संबंधित युवक हुशार व मनमिळावू स्वभावाचा होता. पुण्यातील आयटी कंपनीतील नोकरी सोडून त्याने व्यवसाय सुरू केला होता. मात्र, ऐन उमेदीत त्याच्यावर कोरोनारूपी काळाने घाला घातला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यूhospitalहॉस्पिटलSatara areaसातारा परिसर