शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

भाजप श्रेष्ठींनीे दोन अटी मान्य केल्यानेच उदयनराजेंचा प्रवेश; साताऱ्यात होणार पोटनिवडणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2019 06:39 IST

राष्ट्रवादीला आणखी एक धक्का

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशाला अखेर मुहूर्त सापडला आहे. भाजपश्रेष्ठींनी सर्व अटी मान्य केल्याने उदयनराजे दिल्लीत शनिवारी (दि. १४) पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष व गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

दिल्ली येथे होणाºया प्रवेश सोहळ्यात महाराष्ट्रातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचीही उपस्थिती असणार आहे. लोकसभा सदस्यपदाचा राजीनामा दिल्यानंतर उदयनराजेंना पोटनिवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. ही पोटनिवडणूक विधानसभा निवडणुकीसोबत घेण्यात यावी, तसेच लोकसभेला दगाफटका झाल्यास राज्यसभेचे सदस्यत्व मिळावे, या दोन अटी उदयनराजेंनी भाजप श्रेष्ठींपुढे ठेवल्या होत्या, त्या मान्य झाल्याने उदयनराजेंनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.

उदयनराजे राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा गेल्या महिनाभरापासून सुरू होती. साताºयात उदयनराजेपे्रमींनी घेतलेल्या मेळाव्यात राजेंनी भाजपमध्ये जावे, अशी इच्छा अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली होती. उदयनराजेंनी मात्र भाजप प्रवेशाबाबत कोणतेच जाहीर वक्तव्य केले नव्हते. राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी साताºयात येऊन उदयनराजेंची भेट घेत त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता. पुण्यात खासदार शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत उदयनराजेंना राष्ट्रवादीमध्ये थांबवून ठेवण्यात यश आल्याचे वृत्त पसरले होते. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार शशिकांत शिंदे यांची मुत्सद्देगिरी फलदायी ठरल्याची चर्चाही सुरू होती; पण, उदयनराजेंनी या बैठकीतच पवारांचे आशीर्वाद घेऊन ‘साताºयाच्या विकासासाठी भाजपमध्ये जावेच लागेल,’ असे स्पष्ट केले होते.विकास आघाडीचे सदस्य भाजपमध्येमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेली महाजनादेश यात्रा रविवार, दि. १५ रोजी साताºयात येणार आहे. यावेळी सातारा नगरपालिकेतील सत्ताधारी सातारा विकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, जिल्हा परिषद व पंचायत समितीमधील उदयनराजे गटाचे सर्व सदस्य भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस