शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
3
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
4
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
5
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
6
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
7
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
8
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
9
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
10
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
11
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
12
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
13
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
14
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
15
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
16
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
17
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
18
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
19
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
20
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

दोन वस्तींमध्ये ‘जलयुक्त’ची लक्ष्मणरेषा

By admin | Updated: April 28, 2015 00:19 IST

बांध घातल्यामुळे दळणवळण ठप्प : बागलवस्ती, बोडके वस्तीतील ग्रामस्थ आक्रमक; सात वर्षांपासून रस्त्याची प्रतीक्षा

विठ्ठल नलवडे - कातरखटाव--कातरखटाव पासून दीड किलोमीटरवर असलेल्या बागलवस्ती व बोडकेवस्तीचा गेल्या अनेक वर्षांपासूनचा रस्त्याचा प्रश्न प्रलंबित आहे. अशा परिस्थितीत ‘जलयुक्त शिवार’ अभियानअंतर्गत बागलवस्ती येथे शेतात बांध घातला असल्यामुळे दोन्ही वस्त्यांचा दळणवळणाचा प्रश्न आणखीनच बिकट झाला आहे. वाहतूक ठप्प असल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कातरखटाव येथील बोडकेवस्ती व बागलवस्ती गेल्या आठ वर्षांपासून रस्त्याची मागणी करीत आहेत. वांरवार मोजणी, तहसीलदारांचा निकाल होतोय, प्रांताकडे प्रस्ताव दिला आहे, पुढच्या महिन्यात मोजणी होणार आहे, या लपंडावात या रस्त्याचे काम आजतागायत झाले नाही. सध्या बागल वस्तीवर पंचवीस घरे आहेत व बोडके वस्तीवर जवळपास पन्नास घरे आहेत. दोन्ही वस्तींची सहाशेच्या आसपास लोकसंख्या आहे. शासनाने ‘जलयुक्त शिवार’ अभियानाची काम खेडोपाडी मार्गी लावण्याचा सपाटा लावाला आहे. कातरखटाव परिसरातही ‘जलयुक्त’ची कामे जोमात सुरू आहेत.मात्र, बोडके वस्ती व बागल वस्ती जवळ एका शेतात बांध घातल्यामळे दोन्ही वस्त्यांची दळणवळणाची कोंडी झाली आहे. वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याने ग्रामस्थांना अनेक अचडणींना सामोरे जावे लागत आहे. या बाबत प्रशासनाने लक्ष घालून बागल ग्रामस्थांची होणारी ससेहोलपट थाबंवावी, अशी मागणी होत आहे. रस्त्याविना ग्रामस्थांची परवडबोडके वस्ती व बागल वस्तीत राहणाऱ्या ग्रामस्थांची रस्त्याविना मोठी परवड होत आहे. साधे माचीस आणायचे झाले तरी गावात गेल्याशिवाय पर्याय नाही. शालेय मुलांनाही गावात चालत पायवाटेने जावे लागते. पावसाळ्यात सर्वत्र चिखल होत असल्याने ग्रामस्थांची चांगलीच दमछाक होते. आजारी व्यक्तीला रुग्णालयात नेताना ग्रामस्थांच्या पुढे असंख्य प्रश्न उभे राहतात. उपोषणाचा इशारारस्त्यासंदर्भात बोडके वस्ती व बागल वस्तीतील ग्रामस्थांनी तहसीलदारांना निवेदन देऊनसुद्धा हा प्रश्न जैसे थे आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट असून, प्रशासनाने याची गांभीर्याने दखल न घेतल्यास तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा बागल वस्तीच्या ग्रामस्थांनी दिला आहे.