नातवाचा वाढदिवस पडला दोन लाखांना!

By Admin | Updated: July 11, 2014 23:17 IST2014-07-11T23:13:17+5:302014-07-11T23:17:33+5:30

चचेगावात घरफोडी : घरातील वस्तंूची मोडतोड

Two-and-a-half-year-old grandfather's birthday! | नातवाचा वाढदिवस पडला दोन लाखांना!

नातवाचा वाढदिवस पडला दोन लाखांना!

मलकापूर : बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी साडेसहा तोळे सोन्याच्या दागिन्यांसह सुमारे दोन लाखांचा ऐवज लंपास केला. चचेगाव, ता. कऱ्हाड येथे बुधवारी रात्री ही घटना घडली.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, चचेगाव महादेव दौलत पवार यांचे गावामध्ये भवानी मंदिरामागे राहते घर आहे. संबंधित घरामध्ये महादेव पवार यांच्यासह त्यांची पत्नी, मुलगा, सून व नातू वास्तव्यास आहेत. बुधवारी नातवाचा वाढदिवस असल्याने महादेव पवार यांच्यासह कुटुंबातील सर्वजण रेठरे खुर्दमध्ये गेले होते. वाढदिवसाचा कार्यक्रम झाल्यानंतर पवार कुटुंबीय रेठरे खुर्दमध्येच राहिले. गुरुवारी सकाळी ते परत आपल्या घरी चचेगावमध्ये आले. त्यावेळी घरात चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. चोरट्यांनी कपाटाचे दार कटावणीने उचकटून अडीच तोळ्याची बोरमाळ, अंगठ्या, चैन, बदाम आदींसह इतर चार तोळ्याचे दागिने असा सुमारे साडेसहा तोळ्यांचा ऐवज व मनगटी घड्याळ, मोबाईल लंपास केला. काही महत्त्वाची कागदपत्रेही त्यांनी चोरून नेली. (प्रतिनिधी)
पन्नास हजारांचे नुकसान
चोरट्यांनी घरात प्रवेश केल्यानंतर चोरीबरोबरच वस्तूंची तोडफोडही केली. कपाट, फ्रिज, पलंग, भांड्याचे कपाट आदी साहित्यांची त्यांनी मोडतोड केली. तसेच खाद्यवस्तू, डाळी भरून ठेवलेल्या बरण्या चोरट्यांनी घरातील चारही खोल्यात विस्कटल्या. ही चोरी माहितीच्या व्यक्तीने सुडबुद्धीने केली असावी, असा संशय पोलिसांना आहे.

Web Title: Two-and-a-half-year-old grandfather's birthday!