शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
3
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
4
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
5
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
6
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
7
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
8
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
9
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
10
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
11
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
12
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
13
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
14
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
15
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
16
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
17
दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे ॲटलीच्या 'राका'मध्ये दीपिका पादुकोणची सीन्स कट? मेकर्सने दिलं स्पष्टीकरण
18
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
19
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
20
ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता गरजेची; भारताने होर्मुझ संकटातून धडा घ्यावा, अनिल अग्रवाल यांचे सुचक विधान
Daily Top 2Weekly Top 5

‘व्हॉट्स अ‍ॅप’वरून चिथावणी देणारे तिघेजण ताब्यात

By admin | Updated: November 6, 2014 00:02 IST

कऱ्हाड विधानसभा निवडणूक : जामीन फेटाळला, आणखी काहीच्या अटकेची शक्यता

कऱ्हाड : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान कऱ्हाड दक्षिणचे राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज चव्हाण यांच्याबाबत विशिष्ट धर्मीयांचा संदर्भ वापरून ‘व्हॉट्सअ‍ॅप’च्या माध्यमातून बदनामीकारक मजूकर प्रसिद्ध करून अन्य धर्मीयांना पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरोधी मतदान करण्यासाठी चिथवणीखोर आवाहन केल्याप्रकरणी अज्ञातांचा शोध घेण्यात शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश आले आहे़ याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून, आज (बुधवारी) त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना जामीन नाकरला आहे़ सागर श्रीकांत काळे (वय २५, रा. पावसकर गल्ली, कराड) सचिन श्रीकांत पावसकर (वय ४०, रा. सोमवार पेठ, कराड), गणेश प्रल्हाद पवार (वय ३०, रविवार पेठ, कराड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. निवडणुकीदरम्यान राष्ट्रीय काँग्रेस कार्यकर्ते संजय चव्हाण यांचे मित्र दीपक रावते यांच्या मोबाईलमधील ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रचाराच्या सांगता सभेपूर्वी काढण्यात आलेल्या रॅलीत विशिष्ट धर्र्मीयांची संख्या अधिक होती. त्या धर्र्मीयांच्या धार्मिकस्थळासाठी आठ एकर जागा व पाच कोटींचा निधी मंजूर केला आहे, अशी खोटी माहिती टाकून अन्य धर्र्मीयांनी त्यांच्या धर्माच्या रक्षणासाठी पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात मतदान करावे, असे आवाहन करणारा मजूकर शहरातील एका युवा संघटनेच्या पदाधिकाऱ्याच्या नावाने पाठविण्यात आला होता़ त्यामुळे दोन धर्र्मीयांमध्ये द्वेषभावना निर्माण करून तणावाची परिस्थिती लादण्याचा प्रयत्न अज्ञातांकडून केला जात आहे. हा प्रकार संबंधितांनी स्वत: किंंवा कोणी अज्ञाताने हेतूपूर्वक केला आहे. तरी त्यांच्या विरोधात माझी तक्रार आहे, अशा आशयाची तक्रार संजय चव्हाण यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात दिली होती.माहिती तंत्रज्ञानाचा गैरवापर करून पृथ्वीराज चव्हाण यांची बदनामी करून त्यांच्या विरोधात मतदान करण्यासाठी चिथावणी दिल्याबद्दल अज्ञातांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला होता. शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रभारी अविनाश वनवे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास करून सागर काळे, सचिन पावसकर, गणेश पवार तीन जणांना अटक केली आहे. बुधवार, दि. ५ रोजी येथील न्यायालयात संशयितांना हजर करण्यात आले होते. त्यावेळी त्यांना जामीन नामंजूर करण्यात आला़ त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)अनेकजण नॉट रिचेबल.. याप्रकरणी आणखी १५ ते २० जणांची नावे निष्पन्न झाली असल्याचे पोलीस सांगतात़ मात्र, याची कानकून संबंधितांना लागल्याने ते पसार असून, त्यांचे फोनही नॉट रिचेबल असल्याचे अविनाश वनवे यांनी सांगितले. मात्र, त्यामुळे शहरातील आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे़