शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

कंटेनरच्या जोरदार धडकेत शाळकरी मुलासह दोघे ठार

By admin | Updated: November 6, 2015 23:37 IST

मालखेडजवळ अपघात : दोघेजण गंभीर; दुचाकींना धडक

कऱ्हाड : मालखेड, ता. कऱ्हाड येथे पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर दोन दुचाकींना कंटेनरने जोराची धडक दिली. या अपघातात शाळकरी मुलासह अन्य एकजण ठार तर दोघे जखमी झाले. शुक्रवारी पहाटे हा अपघात झाला. विशाल सर्जेराव पवार (वय ३१, रा. कडेगाव, जि. सांगली) आणि लक्ष्मण पांडुरंग लोंढे (रा. बैलबाजार रोड, मलकापूर) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. तर जखमी झालेल्या विशाल कदम (रा. शिवाजीनगर, ता. कडेगाव) नितीन मोहन कसबे (रा. मलकापूर) यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूर बाजूकडून एक कंटेनर शुक्रवारी पहाटे वेगाने पुण्याकडे निघाला होता. पहाटेच्या सुमारास कंटेनर मालखेडजवळ आल्यावर त्याच्यासमोरून दोन दुचाकींवरून चौघेजण निघाले होते. मालखेडच्या पुलावर आल्यानंतर कंटेनरवरचा चालकाचा ताबा सुटला. ताबा सुटलेल्या कंटेनरने समोरून निघालेल्या दोन्ही दुचाकींना जोराची धडक दिली. दुचाकींवरील चौघेजण कंटेनरखाली अडकले. यातील दोघांच्या डोक्यावरून कंटेनरचे चाक गेल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. डोक्यास गंभीर मार लागल्याने विशाल पवार हा जागीच ठार झाला तर लक्ष्मण लोंढे याला उपचारास नेत असताना त्याचा मृत्यू झाला. अपघाताची नोंद कऱ्हाड तालुका पोलिसांत झाली आहे. पोलीस उपनिरीक्षक रवींंद्र शिंदे तपास करत आहेत. अपघातात मृत झालेला लक्ष्मण लोंढे हा मूळचा सोलापूरचा आहे. त्याचे कुटुंबीय तिकडेच असून, तो शिक्षणासाठी मलकापूरच्या बैलबाजार रोडवर राहणाऱ्या आजीकडे वास्तव्यास होता. तो मलकापूरच्या आनंदराव चव्हाण विद्यालयात नववीत शिक्षण घेत होता. त्याच्या मित्राचे नातेवाईक कोल्हापूर येथे आजारी असल्याने त्यांना पाहावयास तो दुचाकीवरून अन्य एका मित्रासमवेत गेल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)