शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

यंदा ७१ लाख ‘हिरवे मित्र’ घेणार श्वास!

By admin | Updated: July 22, 2014 22:51 IST

जिल्ह्यात सर्वदूर वृक्षारोपण : पावसाअभावी उशिरा लागवड सुरू

नितीन काळेल - सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागात तुरळक निसर्ग संपदा असली तरी पश्चिम भाग निसर्गसौंदर्याने पुरेपूर भरलेला आहे. जिल्ह्यातील निसर्गसौंदर्य वाढावे, गावे, शहरे, रस्ते, वने, जंगल हिरवेगार दिसावे यासाठी यावर्षी जवळपास ७१ लाख रोपे लावण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यावर्षी पावसाळा उशिरा सुरू झाल्याने रोपांची लागवडही उशिरा सुरू झालेली आहे. पर्यावरणाचे महत्व अबाधित आहे. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी सर्वांनीच पुढे यायला हवे असे सर्वच पातळीवरून आवाहन करण्यात येते. शासनाच्या तर अनेक योजना त्यासाठी आहेत. विविध कार्यक्रमातही रोपे भेट देऊन पर्यावरणाचे महत्च सांगण्यात येते. मात्र, एवढी जागरुकता करुनही वृक्षतोड होतच असते. त्यामुळे लोकांनीच आता स्वयंप्रेरणेने वृक्षतोड थांबविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. तरच आहे ते वृक्ष, जंगल वाचेल व पुन्हा एकदा सर्वत्र हिरवेगार दिसू लागेल.सातारा जिल्ह्यात एक लाख ६० हजार हेक्टर इतके वनक्षेत्र आहे. एकूण क्षेत्राच्या ते १६ टक्के इतके आहे. जिल्ह्यात सर्वांत जास्त वनक्षेत्र हे पाटण, महाबळेश्वर, जावळी या तालुक्यात आहे. यावर्षी वन विभगाच्या वतीने जिल्ह्यात ७१ लाख रोपे लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मागीलवर्षी ८० लाख रोपे लावण्यात आली होती. वनविभागाच्या जिल्ह्यात १२ रोपवाटिका असून त्यामध्ये सध्या १९ लाख रोपे तयार आहेत. त्याचबरोबर सामाजिक वनीकरण विभागाने १० रोपवाटिकेतून तयार केलेली ५ लाख ५ हजार रोपे तयार आहेत. यामध्ये विविध प्रकारची रोपे आहेत. २०१४-१५ या वर्षात या रोपांची लागवड करण्यात येणार आहे.