शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

व्याघ्र प्रकल्पावरून पाटणमध्ये जुंपली!

By admin | Updated: May 25, 2015 00:36 IST

जनता संभ्रमात : दोन्ही नेत्यांच्या कोयनानगरला वाऱ्या

अरुण पवार- पाटण -सन १९८५ मध्ये कोयना व चांदोली अभयारण्यांची अधिसूचना निघाली. तेव्हा पाटणच्या वन्यप्राण्यांचा व वनविभागाचा त्रास होत आहे, अशी कोणतीही प्रतिक्रिया उमटत नव्हती. मात्र, या दोन्ही अभयारण्यांत सह्याद्री व्याघ्र प्रकल्प साकारतोय याची चाहूल लागताच पाटणच्या विशेषत: कोयना विभागातील जनतेच्या मनावर विरोधाची सल उभी राहिली. सध्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनवरून पाटणचे आजी-माजी आमदार एकमेकांवर आरोप करण्यात मग्न असून, या दोन्ही नेत्यांचा सभा कोयनानगर येथे सतत सुरू आहेत. त्यामुळे नक्की कोणाचे ऐकायचे, या संभ्रमात कोयना विभागातील जनता आहे.‘सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची निर्मिती आमदार आणि मंत्री असताना झाली. त्यावेळी पाटणकरांनी विरोध का केला नाही. आता मात्र विरोधाचा पुळका दाखवून जनतेची सहानुभूती मिळविण्याचा केविळवाणा प्रयत्न पाटणकर करीत आहेत, असा आरोप शंभूराज देसाई करत आहेत,’ असे विक्रमसिंह पाटणकर एकीकडे सांगत आहेत. त्यावर आक्रमक होऊन मी सातारा येथे राहत असलो तरी पाटणची जनता माझ्या ह्दयात आहे. मी जनतेची किती कामे केली हे १९ हजारांच्या मताधिक्याने निवडून देणाऱ्या जनतेला ज्ञात आहे. तुम्ही पाटणच्या जनतेला किती त्रास दिला किंवा पाटणमध्ये राहून जनतेचा त्रास किती कमी केला याचे उत्तर आमने-सामने येऊन द्यावे, असे आवाहन शंभूराज देसार्इंनी केले आहे.त्यामुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पावरून आजी-माजी आमदारांमध्ये चांगलीच जुंपली आहे. त्यामुळे पाटणच्या जनतेची दोन्ही नेते एकप्रकारे करमणूक करत आहेत, अशीच चर्चा सुरू आहे.कौन सच्चा.. कौन झुठा ?कोयना भूकंप पुनर्वसन निधी, भूकंपग्रस्तांना दाखले मिळण्याबाबतचा न्यायालयाचा निकाल असो किंवा एकाच कामाची दोन भूमिपूजने, उद्घाटन असो. याबाबत पाटण तालुक्यात विक्रमसिंह पाटणकर व शंभूराज देसाई हे दोन्ही नेते चर्चेत आहेत. आता सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा वाद व श्रेयवाद सुरू आहे. याचा निर्णय काय होतो आणि पाटणच्या जनतेचे समाधान कोण करते? किंवा व्याघ्र प्रकल्पातील जाचक अटीतून जनतेची सुटका कोण करणार? हे आगामी काळात समजणार आहे.