शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

चोर सोडून सन्याशाला फाशी !

By admin | Updated: February 9, 2015 00:41 IST

‘महसूल’चा अजब कारभार : देवापूरच्या शेतकऱ्याला वाळूचोर ठरवून केला १९ लाखांचा दंड

म्हसवड : देवापूर, ता. माण येथील शेतकऱ्याला अनधिकृत गौणखनिज उत्खननप्रकरणी महसूल विभागाने १८ लाख ५५ हजार रुपयांचा दंड केला आहे. दंड न भरल्यास मालमत्तेचे समपहरण करून रक्कम वसूल करण्यात येईल, अशी नोटीस बजावण्यात आली आहे. वाळूउपसा प्रकरणाशी काडीचा संबंध नसताना केवळ नदीकाठी जमीन आहे म्हणून एका गरीब शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या महसूल विभागाच्या अजब कारभाराबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.देवापूर येथील विठोबा बाबर यांची ओढ्यालगत वीस गुंठे जमीन आहे. ओढ्यातून वाळूचोरी असल्याने याबाबत वारंवार तलाठ्यांना सांगूनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. उलट तलाठ्याने तक्रारदार शेतकऱ्यानेच वाळू उत्खनन केल्याप्रकरणी आपण दंडास पात्र असल्याने बाजारभावाप्रमाणे तिप्पट दंड का आकारू नये, याबाबत लेखी अथवा तोंडी म्हणणे मांडावे, अशी नोटीस बजावली आहे.याबाबत संबंधित विठोबा बाबर यांनी तहसीलदारांकडे आपले लेखी म्हणणे मांडले आहे. त्यामध्ये असे म्हटले आहे की, माझ्या जमिनीचा गट नं. २७५ असून हा पंचनामा माझ्या जमिनीशेजारील इरिगेशन क्षेत्रात झाला असून माझ्या जमिनीशी काहीही संबंध नाही. तरीही मला नाहक त्रास दिला जात आहे. त्यानंतर महसूल विभागाने १४ लाख ८४ हजारांची दुसरी नोटीस दिली. त्यानंतर तिसरी नोटीस घेण्यास नकार दिला म्हणून दारावर चिकटवून दंड देण्यास तुम्ही कसूर केली, त्यामुळे एकूण १८ लाख ५५ हजार रुपये देण्यास तुम्ही पात्र आहात. दंड न भरल्यास मालमत्तेचे समपहरण करून रक्कम वसूल करण्यात येईल. नोटीस पाहिल्यानंतर न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा मिळाल्यामुळे विठोबा बाबर हे शेतकरी हबकून गेले आहेत. ओढ्यातील वाळूचोरी प्रकरणाशी काहीही संबंध नसताना महसूल खात्याने लाखो रुपयांचा दंड ठोठावल्याने बाबर कुटुंब उघड्यावर आले आहे. (प्रतिनिधी)पाटबंधारे खात्याच्या जमीन हद्दीत वाळूचोरी झाली आहे. त्याचा पंचनामा झाला असून त्याच्याशी माझा कसलाही संबंध नाही. महसूल खाते माझ्या मालमत्तेवर टाच आणण्याचा प्रयत्न करत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी यामध्ये लक्ष घालून माझ्यावर होत असलेला अन्याय दूर करावा.- विठोबा बाबर, शेतकरी, देवापूर