शहरं
Join us  
Trending Stories
1
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
2
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
3
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
4
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
5
₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?
6
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
7
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
8
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
9
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
10
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
11
मोदींच्या रोड शोमुळे मेट्रोसेवा बाधित; जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रोसेवा दोन तास बंद
12
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
13
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
14
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
15
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
16
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
17
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
18
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश
19
व्यावसायिकाच्या घरावर पोलिसांच्या मदतीने दरोडा; निवडणुकीसाठीचा पैसा दडवल्याचा बनाव
20
खार, वांद्रे परिसरांत ६६ लाखांची रोकड जप्त; आचारसंहिता भरारी पथकाची कारवाई

सातारा हिल मॅरेथॉनची तारीख ठरली, असे असणार यंदाचे नियोजन

By प्रगती पाटील | Published: March 25, 2024 6:31 PM

वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षपदी डॉ. अदिती घोरपडे तर उपाध्यक्षपदी आर्किटेक्ट उपेंद्र पंडित यांची निवड

सातारा : सातारा रनर्स फौंडेशनची बारावी वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षपदी डॉ. अदिती घोरपडे यांची तर उपाध्यक्षपदी आर्किटेक्ट उपेंद्र पंडित व सेक्रेटरी विशाल ढाणे यांची निवड करण्यात आली. स्पर्धेचे रेस डायरेक्टर म्हणून अभिषेक भंडारी यांची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे. यंदा हिल मॅरेथाॅन १ सप्टेंबरला होणार असून त्याचा सराव १२ मे पासून सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.यावेळी बोलताना संस्थापक अध्यक्ष डॉ. संदीप काटे म्हणाले, ‘स्पर्धा रविवार, दिनांक १ सप्टेंबरला रोजी होणार आहे. एक्स्पो हा शुक्रवार, दिनांक ३० आणि शनिवार दिनांक ३१ ऑगस्ट २०२४ रोजी शेंद्रे येथे आहे. जिल्ह्यातील आधारकार्ड असलेल्या स्थानिक स्पर्धकांना स्पर्धेमध्ये प्राधान्य देणार असून त्यांना फीमध्ये सवलत असणार आहे. १६ आठवड्याचा लाॅंग रन प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला असून हे प्रशिक्षण दिनांक १२ मे पासून पोलीस परेड ग्राउंड, सातारा येथे सकाळी ५.४५ वाजता सुरु होईल.मेडिकल डायरेक्टर डॉ. प्रतापराव गोळे यांनी मनोगत व्यक्त केले. रेस डायरेक्टर अभिषेक भंडारी यांनी गेल्या वर्षीचा स्पर्धेचा सविस्तर अहवाल आणि अंदाजपत्रक सादर केले. याप्रसंगी माजी अध्यक्ष अॕड. कमलेश पिसाळ यांचा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सचिव पदी निवड झाल्याबद्दल सर्व सभासदांच्या वतीने सत्कार करण्यात आला. सचिव डॉ. रंजिता गोळे यांनी सूत्रसंचालन व आभार मानले. यावेळी डॉ. चंद्रशेखर घोरपडे, डॉ. प्रतापराव गोळे, डॉ. पल्लवी पिसाळ, डॉ. सुचित्रा काटे, डॉ. अविनाश शिंदे, डॉ. देवदत्त देव, डाॅ. अश्विनी देव, शैलेश ढवळीकर, डॉ. अजय शेडगे, डॉ. महेश विभुते, मंगेश वाडेकर सभासद उपस्थित होते.

असे असेल यंदाचे नियोजनमॅरेथाॅनसाठी प्री रजिस्ट्रेशन आणि फायनल रजिस्ट्रेशन अशा दोन टप्प्यात स्पर्धेचे रजिस्ट्रेशन ऑनलाइन पध्दतीने होणार आहे. रजिस्ट्रेशनचा पहिला टप्पा ३ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ६ वाजता ते ७ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत खुला असणार आहे. यामध्ये स्पर्धकाने तपशील भरायचा आहे. प्री रजिस्ट्रेशनवर माहिती भरायची आहे, या टप्प्यावर पैसे भरायचे नाहीत.प्री रजिस्ट्रेशन झाल्यावर ई मेल आयडी वर एक कोड येईल, हा कोड म्हणजे फायनल रजिस्ट्रेशनसाठीचा पास असणार आहे. ज्या स्पर्धकांनी प्री रेजिस्ट्रेशन केलं आहे फक्त त्यांनाच दुसऱ्या टप्प्यात दि. १० एप्रिल रोजी रजिस्ट्रेशन फी भरून स्पर्धेचे फायनल रजिस्ट्रेशन करण्याची संधी मिळेल. 

सातारा हाफ हिल मॅरेथाॅनने जागतिक पातळीवर आपल्या कर्तृत्वाने ठसा उमटविला आहे. यात सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाचे हे यश आहे. तेराव्या वर्षात पर्दापण करणाऱ्या या रेसला सातारकरांच्या आरोग्य समृध्दीशी जोडण्याचा प्रयत्न करणार आहे. आरोग्यदायी साताऱ्यासाठी ही रेस अनेकांच्या आयुष्यात बदल घडवून आणणारी ठरेल यात शंकाच नाही. - डाॅ. अदिती घोरपडे, अध्यक्ष सातारा रनर फाैंडेशन

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMarathonमॅरेथॉन