शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
4
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
5
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
6
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
7
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
8
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
9
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
10
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
11
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
12
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
13
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
14
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
15
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
16
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
17
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
18
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
19
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
20
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षिकेची आत्महत्या

By admin | Updated: April 25, 2015 00:01 IST

लावंगर येथील घटना : विवाहापूर्वीच कृत्य

परळी : विवाह अवघ्या बारा दिवसांवर येऊन ठेपला असतानाच तरुण शिक्षिकेने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना सातारा तालुक्यातील लावंघर येथे शुक्रवारी पहाटे घडली. तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अनुराधा संजय पवार (वय २४, रा. लावंघर) असे या युवतीचे नाव आहे. बारावीनंतर डी.एड. करून ती भोंदवडे येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षिका म्हणून काम करीत होती. मागील महिन्यात तिच्या लग्नाची सुपारी फुटली होती. तिचा नियोजित वर अधिव्याख्याता असल्याची माहिती मिळाली. विवाह येत्या ७ मे रोजी होणार होता. त्यासाठी गुरुवारीच साताऱ्यात बस्ताही झाला होता. त्यानंतर सायंकाळी बराच वेळ अनुराधाच्या मैत्रिणी तिच्या घरात तिच्यासोबत होत्या. विवाहाच्या निमंत्रण पत्रिकांचा मजकूर तयार करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. सर्वजण आनंदात होते. तथापि, पहाटेच्या सुमारास अनुराधाने विष प्राशन केले असण्याची शक्यता असून, सकाळी लवकर हा प्रकार कुटुंबीयांच्या लक्षात आला. त्यांनी तातडीने अनुराधाला उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तथापि, तिला मृत घोषित करण्यात आले. अनुराधा तीन महिन्यांची असताना तिची आई तिला सोडून गेली होती आणि तिचा सांभाळ तिच्या आजीने केला. तिच्या वडिलांनी दुसरे लग्न केले असून, ते वेगळे राहतात. घटनेची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात झाली आहे. (वार्ताहर)