शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
5
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
6
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
7
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
8
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
9
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
10
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
12
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
13
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
14
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
15
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
16
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
17
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
18
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
19
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
20
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
Daily Top 2Weekly Top 5

गुरुजींना म्हणे ‘साखर कारखाना’ कडवट

By admin | Updated: April 30, 2015 00:21 IST

निवडणुकीच्या प्रचाराची प्रथमच जबाबदारी : निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा आदेश

खंडाळा : लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुका पार पाडण्याची जबाबदारी शिक्षक वर्ग नेहमीच निष्ठेने करीत आला आहे. कारण या निवडणुका सरकारी कामकाजाचा अविभाज्य भाग बनल्या आहेत. पण, साखर कारखान्याची निवडणूक कामकाजासाठी प्रथमच शिक्षकांना आदेश काढण्यात आले आहेत. सध्या प्रत्येक शाळांच्या परीक्षेचा काळ सुरू आहे. परीक्षा संपवून वार्षिक निकाल देण्याची जबाबदारी पण शिक्षकांचीच आहे. विशेषत: येत्या २ मे रोजी निकाल जाहीर करण्याचे शिक्षण विभागाचे आदेश आहेत, तर त्याच दिवशी निवडणूक कामकाजासाठी सकाळीच हजर राहण्याचे आदेश निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे आहेत. त्यामुळे निकाल की निवडणूक आधी लगीन कोणाचे? असा प्रश्न आता गुरूजनांसमोरच पडल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.किसन वीर सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली आहे. दि. ३ मे रोजी मतदान होणार आहे, यासाठी महसूल विभागाने या निवडणुकांसाठी खंडाळा, वाई तालुक्यांतील शिक्षकांना आदेश दिले आहेत. वास्तविक शिक्षकांना आजवर सार्वत्रिक निवडणुका करण्याचे काम बंधनकारक होते; मात्र आता सहकारी क्षेत्रातील निवडणुकांचे कामही सोपवल्याने संभ्रमावस्था झाली आहे. प्रत्येक शाळेत नुकताच परीक्षेचा काळ संपला असून, पेपर तपासणी, मूल्यांकन नोंदी व वार्षिक निकाल तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.याच दरम्यान, निवडणुकीचे आदेश येऊन ठेपल्याने काय करायचे, असा यक्षप्रश्न शिक्षकांना पडला आहे. निवडणुकीसाठी दि. ३० एप्रिल व २ मे रोजी प्रशिक्षण वर्ग घेण्यात आली आहेत. त्यांना उपस्थित राहणेही गरजेचे आहे. कोणत्या कामाला प्राधान्य द्यावे याची कोणतीही रूपरेषा मांडण्यात आली नाही.दि. २ मे रोजी निकाल कधी द्यायचा, कुणी द्यायचा आणि प्रशिक्षणाला हजर कसे राहायचे? या प्रश्नांमुळे संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. कित्येक शाळेतील सर्वच शिक्षकांना निवडणुकीचे आदेश आहेत. त्यामुळे शाळेवर एकही शिक्षक उरत नाही. शिवाय कोणत्याही परिस्थितीत आदेश रद्द केला जाणार नसल्याचेही नमूद केले आहे. त्यामुळे शिक्षकांची दोलनामय अवस्था झाली आहे.(प्रतिनिधी)मतदानाचा हक्क हिरावला जाणार ?शिक्षकांची बी.एड. ची परीक्षा आहे त्यांच्याही पुढे पेपर कसे देणार ही समस्या आहे. काही शिक्षक स्वत: कारखान्याचे सभासद आहेत, त्यांनाही आदेश दिल्याने त्यांच्या मतदानाचा हक्क हिरावला जाणार का? अशीही चर्चा सुरू आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे जे शिक्षक दीर्घमुदतीच्या रजेवर आहेत, त्यांनाही आदेश काढले आहेत. त्यामुळे त्यांनी काय करायचे, त्यांची आॅर्डर निघालीच कशी, असाही प्रश्न शिक्षकांसमोर आहे. मात्र, याबाबत निवडणूक अधिकारी किंवा शिक्षण विभाग यांच्याकडून कोणतेही मार्गदर्शन अद्याप झालेले नाही.