शहरं
Join us  
Trending Stories
1
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
2
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
3
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
4
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
5
“प्रियंका चोप्रामुळे राघव चड्ढा यांचा भाजपात प्रवेश”; नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीचा मोठा दावा
6
धक्कादायक! नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, तरुणाला अटक
7
Budh Pradosh 2026: कर्जमुक्ती आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी २९ एप्रिलला न चुकता करा 'बुध प्रदोष' व्रत
8
Top Marathi News LIVE Updates: १ मेपासून मराठीची मोहीम सुरूच राहणार; मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
9
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
10
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
11
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
12
गोलsss... पंतप्रधान नरेंद्र मोदी सिक्कीमच्या तरुणांसोबत खेळले फुटबॉल, PHOTOS ची रंगली चर्चा
13
वाढदिवसासाठी Reel तयार करण्याच्या नादात युवकाने भलताच उद्योग केला; शेवटी हातात पडल्या बेड्या
14
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
15
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
16
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
17
‘RTE’ प्रवेश! पसंतीच्या शाळेसाठी पालकांची कोंडी; ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ, तरीही संभ्रम कायम
18
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
19
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
20
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

धरणे लागली भरू...

By admin | Updated: July 22, 2015 23:56 IST

साताऱ्यात रिमझिम : शेतकरी समाधानी

सातारा : रानोमाळ पळून गेलेल्या पावसानं जिल्ह्यात पुन्हा जोरदार सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. महाबळेश्वरमध्ये बुधवारी धो धो पावसाची बरसात तर साताऱ्या रिमझिम पाऊस पडला. गेल्या तीन आठवड्यापासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. पेरण्या करून बळीराजा आभाळाकडे डोळे लावून बसला होता, मात्र आभाळातून एक ठिपूसही गळत नव्हता. जिल्हावासीयांनी मंगळवारी ‘माउलीं’ना निरोप देत पावसाचे साकडे घातले अन् सातारासह जिल्ह्यात पावसाने पुन्हा हजेरी लावली. महाबळेश्वर, वाई, जावळी, पाटण तालुक्यात जोरदार पाऊस झाला तर माण, खटाव, फुलटण, खंडाळा तालुक्यात रिमझिम पाऊस झाला. सातारा शहरात दिवसभर ढगाळ वातावरण होते. मात्र, पावसाचे प्रमाण कमी होते.पावसाने पुन्हा हजेरी लावल्यामुळे दुबार पेरणी केलेल्या शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. तर पावसाअभावी अद्याप पेरणी न झालेल्या क्षेत्रातही असाच पाऊस राहिला तर पेरण्या करता येणार आहेत. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात बुधवारीही पावसाचा जोर कायम राहिल्याने धरणात प्रतिसेकंद १७ हजार ७०४ क्सुसेक पाण्याची भर पडत आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा आजअखेर ५७.०६ टीएमसीवर पोहोचला आहे. (प्रतिनिधी)बुधवारी कोयना धरण पाणलोट क्षेत्रात झालेला पाऊस असा-कोयना १६ मिमी., नवजा २३ मिमी., तर महाबळेश्वरमध्ये दिवसभरात १४८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात २.४१ टीएमसीने वाढ झाली आहे.पाच धरणांतून विसर्ग जिल्ह्यात काल जोरदार पुनरागमन केलेल्या पावसाचा जोर कायम असून जिल्ह्यातील धरणांमधील पाणीपातळीत वाढ होत आहे. कालपासून वीर धरणातून २ हजार ३७७ क्युसेक, मोरणा-गुरेघरमधून ३२० क्सुसेक, तारळी १४५ तर बुधवारी कोयना धरण पाणलोट क्षेत्रात झालेला पाऊस असा-कोयना १६ मिमी., नवजा २३ मिमी., तर महाबळेश्वरमध्ये दिवसभरात १४८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात २.४१ टीएमसीने वाढ झाली आहे.उरमोडीमधून ४५० क्युसेक प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर बुधवारी वांग धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे.