शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

कागलमधील महिलेचा साताऱ्यात संशयास्पद मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 11:19 IST

सातारा येथील शाहूनगरमधील एका फ्लॅटमध्ये लक्ष्मी तानाजी कांबळे (वय ४०, रा. शेंदूर, ता. कागल, जि. कोल्हापूर) या महिलेचा गुरुवारी रात्री आठच्या सुमारास संशयास्पद मृतदेह आढळून आला. त्यांचा घातपात झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

ठळक मुद्देकागलमधील महिलेचा साताऱ्यात संशयास्पद मृत्यूघातपाताचा संशय : पोलिसांकडून तपास सुरू

सातारा : येथील शाहूनगरमधील एका फ्लॅटमध्ये लक्ष्मी तानाजी कांबळे (वय ४०, रा. शेंदूर, ता. कागल, जि. कोल्हापूर) या महिलेचा गुरुवारी रात्री आठच्या सुमारास संशयास्पद मृतदेह आढळून आला. त्यांचा घातपात झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, लक्ष्मी कांबळे या गेल्या दोन महिन्यांपूर्वी साताऱ्यात आल्या होत्या. त्यांची दोन मुले आणि सासू गावाकडे वास्तव्यास आहेत. साताऱ्यातील शाहूनगरमध्ये त्यांनी भाड्याने फ्लॅट घेतला होता. त्या रोज सेंट्रिंगच्या कामावर जात होत्या.

दोन दिवसांपासून त्यांचा फ्लॅट बंद होता. गुरुवारी सायंकी फ्लॅटमधून दुर्गंधी येऊ लागल्यानंतर शेजाऱ्यांनी शहर पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. दरवाज्याला आतून कडी लावली नव्हती. पोलीस फ्लॅटमध्ये गेल्यानंतर लक्ष्मी कांबळे यांचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविला.मृतदेहाच्या अंगावर जखमा नाहीत. मात्र, त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे अद्याप समोर आले नाही. दरवाजा उघडा असल्यामुळे त्यांचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. शवविच्छेदन अवाहल प्राप्त झाल्यानंतरच यातील वस्तुस्थिती समोर येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. सहायक पोलीस निरीक्षक एस. के. मोरे हे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :Deathमृत्यूSatara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारी