शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

सुशांत पवार याची व्हिएतनाम शिपिंगसाठी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:14 IST

मर्चंट नेव्ही अधिकारी प्रशिक्षणाबाबत मार्गदर्शन करणाऱ्या येथील आरके मरीन करिअर अकॅडमीचा विद्यार्थी सुशांत शंकर पवार याची एस शिप ...

मर्चंट नेव्ही अधिकारी प्रशिक्षणाबाबत मार्गदर्शन करणाऱ्या येथील आरके मरीन करिअर अकॅडमीचा विद्यार्थी सुशांत शंकर पवार याची एस शिप मॅनेजमेंटच्या वतीने व्हिएतनाम येथे ऑफिसर पदावर निवड झाली आहे. त्याच्या या निवडीबद्दल अकॅडमीचे संचालक राहुलकुमार खडके यांनी त्याचा सत्कार केला.

सुशांत याने कृष्णा कॉलेज कराड येथे शिक्षण घेतले. तर बीएस्सी नॉटिकल सायन्स हा शिपिंगचा अभ्यासक्रम इंटरनॅशनल मेरीटाइम अकॅडमी चेन्नई ,तमिळनाडू येथून खडके यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केला. परदेशात जहाजावर अधिकारी म्हणून काम करण्याचे त्‍याचे लहानपणापासून स्वप्न होते. शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी असल्याने अनेक अडचणी होत्या मात्र, कुटुंबीयांचे पाठबळ आणि आर के मरीनचे सहकार्य यामुळे हे यश मिळाल्याचे सुशांत पवार सांगतो .

आर के मरीन अकॅडमीच्या मार्गदर्शनाखाली आजवर २००० हून अधिक जण परदेशी शिपिंग कंपनीमध्ये अधिकारी पदावर कार्यरत आहेत. या अकॅडमी मुळेच माझ्या मुलाचे स्वप्न पूर्ण झाले; अशी प्रतिक्रिया पालक शंकर पवार यांनी व्यक्त केली.

सुशांत पवार यांना राहुलकुमार खडके यांनी सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ देऊन त्याचा सत्कार केला. विठ्ठलराव खडके यांच्या हस्ते त्याला विमान तिकीट व व्हिसा देण्यात आला. यावेळी हनुमंत कुंभवडे ,संगीता पवार, ऋतिक कुंभवडे, प्रशांत पवार, तेजस बंके ,डॉ. प्रवीण माने, विराज बोराडे, विनायक माने, संग्राम यादव यांची उपस्थिती होती. (वा प्र )

---------------------------

फोटो :पाठवत आहे.

फोटो ओळ: कराड येथे सुशांत पवार याचा सत्कार करताना राहुलकुमार खडके