शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

पाचवडेश्वर पुलाच्या भूस्तर तपासणीस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:38 IST

यावेळी जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, कृष्णा कारखान्याचे माजी अध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, युवक ...

यावेळी जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, कृष्णा कारखान्याचे माजी अध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, काँग्रेसचे शहराध्यक्ष राजेंद्र माने, मलकापूर शहराध्यक्ष राजेंद्र यादव, इंद्रजीत चव्हाण, राहुल चव्हाण, जाकीर पठाण यांच्यासह बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी व ठेकेदार उपस्थित होते.

पुणे-बंगळुरु आशियाई महामार्ग आणि कऱ्हाड-तासगांव मार्गाला जोडण्यासाठी कऱ्हाड व मलकापूर शहरातील किंवा रेठरे पूल हे एकमेव रस्ते होते. याशिवाय पर्यायी शॉर्टकट रस्ता उपलब्ध नव्हता. या परिसरातील गावांची अडचण व शहरांमधील वाहतुकीची कोंडी विचारात घेऊन पाचवडेश्वर ते कोडोली दरम्यान कृष्णा नदीवर पुलाची उभारणी करणे आणि आशियाई महामार्ग कऱ्हाड-तासगाव राज्यमार्गाला जोडणे आवश्यक होते. ही गरज ओळखून कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी या पर्यायी रस्त्यासह पुलाचे सर्वेक्षण करण्यास सांगितले. तसा आराखडा तयार केला.

आमदार चव्हाण यांनी सातत्याने पाठपुरावा करुन रस्त्यासह पुलाची मंजुरी मिळवली. या पुलाच्या कामासाठी आमदार चव्हाण यांच्या प्रयत्नाने ४५ कोटींचा निधी मंजूर झाला. या पुलाच्या उभारणीला लवकरच सुरुवात करण्यासाठी भूस्तर तपासणी करण्यात आला आहे.

- कोट

पाचवडेश्वर येथे कृष्णा नदीवरील पुलासाठी ४५ कोटी निधी मंजूर आहे. या पुलामुळे पुणे-बंगळुरु आणि कऱ्हाड-तासगाव हे दोन्ही मार्ग जोडले जातील. दोन खोऱ्यांना जोडणाऱ्या या पुलामुळे कऱ्हाड आणि मलकापूर शहरातील वाहतूक व दळणवळणाचा भार कमी होईल. पाचवडेश्वर परिसरासह कोडोली, दुशेरे, कार्वे, शेणोली, गोंदी अशा आनेक गावांच्या शहरीकरणासह विकासाला चालना मिळेल.

- पृथ्वीराज चव्हाण

आमदार, कऱ्हाड दक्षिण

- चौकट

प्रत्येकी ४० मीटर अंतराचे ८ पिलर

प्रत्येकी ४० मीटर अंतराच्या ८ पिलरवर पूल उभा केला जाणार आहे. त्यावरील रस्ता सहापदरी असणार आहे. दोन्ही बाजूच्या रस्त्याचे कामही पूर्ण होणार आहे. लवकरच टेंडर निघेल. त्यानंतर भव्य स्वरूपात भूमिपूजनाचा कार्यक्रम घेतला जाईल, अशी माहिती यावेळी आमदार चव्हाण यांनी दिली.

फोटो : ०९केआरडी०३

कॅप्शन : पाचवडेश्वर, ता. कऱ्हाड येथे उभारण्यात येणाऱ्या पुलाच्या भूस्तर तपासणीस आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला.