शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

‘पुरस्कृत’साठी अडले काकांचे घोडे

By admin | Updated: September 26, 2014 23:31 IST

कऱ्हाड दक्षिण : अधिकृत उमेदवारीच घेण्याचा राष्ट्रवादीचा उंडाळकरांना आग्रह

सातारा : कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे विद्यमान आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांचा पत्ता कट झाल्यानंतर ते कोणत्या पक्षाकडून लढणार याचीच चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादीचे राज्य पातळीवरील नेते त्यांच्या संपर्कात असले, तरी काकांनी पुरस्कृत करा म्हणून राष्ट्रवादीकडे इच्छा व्यक्त केली आहे, तर राष्ट्रवादी त्यांना उमेदवारीच घ्यायला सांगत असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयातून देण्यात आली.सातारा जिल्ह्यातील सर्वात लक्षवेधी लढत कऱ्हाड दक्षिणची ठरणार आहे. काँग्रेसने येथून विद्यमान आ. उंडाळकरांचीच गच्छंती करत पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे. परिणामी ‘काका काँग्रेस’च्या समर्थकांनी आपले राजीनामे दिले आहेत. मात्र, कऱ्हाड दक्षिणमधून राष्ट्रवादीकडून इच्छुक अनेक असले तरी काका राष्ट्रवादीचे उमेदवार असल्याच्या चर्चा दिवसभर जिल्ह्यात रंगल्या होत्या. रामराजे नाईक-निंबाळकर त्यांच्या दिवसभर संपर्कात होते. राज्य पातळीवरील अन्य नेतेही त्यांच्यांशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती घेत होते.राष्ट्रवादीचे पाचजणांना ‘एबी’ फॉर्मराष्ट्रवादी काँग्रेसकडून शशिकांत शिंदे, सत्यजितसिंह पाटणकर, शिवेंद्रसिंहराजे भोसले, मकरंद पाटील आणि बाळासाहेब पाटील यांना ‘एबी’ फॉर्म दिले. सदाशिवराव पोळ यांची उमेदवारी जाहीर झाली असली तरी त्यांचा ‘एबी’ फॉर्म राष्ट्रवादी कार्यालयातून शशिकांत शिंदे यांच्याकडे देण्यात आला होता. मात्र, शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत तो पोळ यांच्यापर्यंत पोहोचला नव्हता. तसेच रामराजेंकडून फलटणच्या नावाचा निरोप न आल्यामुळे तो अर्ज राष्ट्रवादीचे सरचिटणीस राजकुमार पाटील यांच्याकडे ठेवला गेला.अकस्मात चर्चेत आली नावे...काँग्रेस-राष्ट्रवादी आणि महायुती तुटल्याचे स्पष्ट झाल्यानंतर साऱ्यांचीच धावपळ उडाली. सर्वांपुढेच उमेदवार कोण, असे प्रश्न निर्माण झाले. सातारा-जावळीतून काँग्रेसकडून रजनी पवार, तर कोरेगावातून विजय कणसे यांची उमेदवारी निश्चित झाली. सातारा-जावळीतून भाजपचा ‘एबी’ फॉर्म दीपक पवार यांना मिळाल्याचे सांगण्यात आले. काही दिवसांपूर्वी ‘स्वाभिमानी’मध्ये गेलेले दिगंबर आगवणे यांचे काँग्रेसकडून नाव निश्चित झाले. पुरुषोत्तम जाधव मुंबईहून भाजपचा ‘एबी’ फॉर्मच घेऊन आले.