खराडेतील रस्त्यावर प्रथमच धावली एसटी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:36 IST2021-03-08T04:36:26+5:302021-03-08T04:36:26+5:30

खराडे येथील विद्यार्थी, नोकरदार व ग्रामस्थांना कऱ्हाडला जाताना व येताना गैरसोयीचा सामना करावा लागत होता. त्यामुळे कऱ्हाड-खराडे-बेलवाडी-कालगाव व कालगाव-बेलवाडी-खराडे-कऱ्हाड ...

ST ran for the first time on the road in Kharade! | खराडेतील रस्त्यावर प्रथमच धावली एसटी!

खराडेतील रस्त्यावर प्रथमच धावली एसटी!

खराडे येथील विद्यार्थी, नोकरदार व ग्रामस्थांना कऱ्हाडला जाताना व येताना गैरसोयीचा सामना करावा लागत होता. त्यामुळे कऱ्हाड-खराडे-बेलवाडी-कालगाव व कालगाव-बेलवाडी-खराडे-कऱ्हाड अशी एसटी सकाळी व सायंकाळी सुरू करावी, या मागणीचे पत्र सरपंच सुनीता कदम यांनी खासदार श्रीनिवास पाटील यांना दिले होते. या मागणीचा तातडीने पाठपुरावा करत खासदार श्रीनिवास पाटील यांनी परिवहन महामंडळाचे सातारा येथील विभागीय नियंत्रक सागर पळसुळे यांच्याकडे शिफारस केली. त्यानुसार तातडीने कार्यवाही करीत एसटी सुरू करण्याचे शिफारसपत्र कऱ्हाड आगाराचे व्यवस्थापक विजय मोरे यांना जिल्हा ग्रंथालय विभागाचे अध्यक्ष हणमंतराव जाधव, उपसरपंच विक्रम गुरव, संजय कदम यांच्याकडून देण्यात आले.

खराडेतील ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेत खासदार श्रीनिवास पाटील यांनी विशेष प्रयत्न केल्यामुळे गावाला एसटी सुरू झाली असून ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

Web Title: ST ran for the first time on the road in Kharade!