शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याचा जीव वाचविण्यासाठी स्पेशल रेस्क्यू ऑपरेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:06 IST

मलकापूर : महामार्गावर पंधरा मिनिटे थरार करून उसाच्या शेतात धूम ठोकलेल्या जखमी बिबट्याचा जीव वाचविण्यासाठी स्पेशल रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात ...

मलकापूर : महामार्गावर पंधरा मिनिटे थरार करून उसाच्या शेतात धूम ठोकलेल्या जखमी बिबट्याचा जीव वाचविण्यासाठी स्पेशल रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आले. वन्यजीव सुरक्षाअंतर्गत ८ किलोमीटर फॉरेस्ट ट्रॅपचा अवलंब करण्यात आला, तर बुधवारी सकाळपासूनच १० तासांत पंधरा हेक्टर ऊसक्षेत्रात शोधमोहीम राबवली. या शोधमोहिमेत कऱ्हाड वन विभागाच्या ९ कर्मचाऱ्यांसह कोल्हापूर येथील विशेष पथकाने ओढे-नाल्यांसह उसाचे क्षेत्र पिंजून काढले, पण एका रात्रीत बारा गावच्या सीमा पार करणारा बिबट्या काही सापडला नाही.

सिमेंटच्या जंगलात वाढ झाल्यामुळे नैसर्गिक जगलाचा ऱ्हास होत आहे. परिणामी वन्यप्राण्यांचा नागरी वस्तीतील वावर दिवसेंदिवस वाढल्याचे चित्र दिसत आहे. रस्त्यांचे जाळे व वाहनांची वाढती संख्या भक्ष्याच्या शोधात बाहेर पडणाऱ्या वन्यप्राण्यांच्या जिवावर बेतत आहे. गेल्या दहा दिवसांत वाहनांच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू होण्याच्या चार घटना घडल्या आहेत, तर उसाच्या शेतात मृतावस्थेत बिबट्या सापडल्याच्या घटनाही घडल्या आहेत. तशीच घटना काल नांदलापूर गावच्या हद्दीत पाचवड फाट्यानजीक हॉटेल समृद्धीसमोर मंगळवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. अज्ञात वाहनाची धडक बसल्याने अचानक बिबट्याने महामार्गावरच ठिय्या मारला. यामुळे वाहनधारकांसह सर्वांचीच त्रेधा उडाली. या घटनेची माहिती मिळताच वनाधिकाऱ्यांसह कर्मचारी व प्राणीमित्रांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र त्यापूर्वीच पंधरा मिनिटातच गर्दी बघून जखमी बिबट्याने जीव वाचविण्यासाठी कृष्णा नदीकडील उसाच्या शेतात धूम ठोकली होती. रात्रीच्यावेळी अधिकाऱ्यांसह प्राणीमित्र व नागरिकांनी रात्री साडेबारा वाजेपर्यंत महामार्गालगत व उसाच्या बाजूने शोध घेतला असता बिबट्या आढळला नाही. साडेबारा वाजता शोधमोहीम थांबवली. बुधवारी सकाळी पुन्हा साडेसात वाजता शोधमोहीम सुरू केली. जखमी बिबट्याचा जीव वाचविण्यासाठी स्पेशल रेस्क्यू ऑपरेशन राबविण्यात आले. या शोधमोहिमेसाठी वन्यजीव सुरक्षाअंतर्गत ८ किलोमीटर फॉरेस्ट ट्रॅपचा अवलंब करण्यात आला. तर बुधवारी नांदलापूर व कापीलच्या सकाळपासूनच १० तासांत निनाई ओढ्याच्या दुतर्फा पंधरा हेक्टर ऊसक्षेत्रात शोधमोहीम राबविली. या शोधमोहिमेत वनक्षेत्रपाल अर्जुन गंभरे, वनपाल ए. पी. सव्वाखंडे, वनरक्षक रमेश जाधवर, वनरक्षक प्रशांत मोहिते, उत्तम पांढरे, मंगेश वंजारे, सचिन खंडागळे, कोल्हापूर येथील रेस्क्यू टीमचे डाॅ. संतोष वाळवेकर, अमित कुंभार, अनिल ढोले अशा अकरा कर्मचाऱ्यांनी ओढे-नाल्यांसह झाडा-झुडपातून व उसाचे क्षेत्र पिंजून काढले. मात्र सायंकाळपर्यंत शोध लागला नाही.

चौकट

ट्रॅप कॅमेऱ्यांचा वॉच

बुधवारी संध्याकाळी अंधार पडेपर्यंत जखमी बिबट्याचा शोध लागला नव्हता. वाहनांच्या धडकेत बिबट्याला नेमकी किती इजा झाली, हे काहीही समजले नाही. लवकरात लवकर उपचार होणे गरजेचे आहे. उसाचे क्षेत्र मोठे असल्यामुळे शोधमोहिमेत अडचणी येत आहेत. रात्रीच्यावेळी या परिसरात कोल्हापूर विभागीय वनपरिक्षेत्राच्या रेस्क्यू टीमचे डॉ. संतोष वाळवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रॅप कॅमेऱ्याचा वॉच ठेवला जाणार आहे, अशी माहिती वनाधिकाऱ्यांनी दिली.

चौकट

रिव्हॅलो ॲपद्वारे फॉरेस्ट ट्रॅप

जखमी बिबट्या ज्या उसाच्या क्षेत्रात गेला, त्याचा शोध घेण्यासाठी स्पेशल पध्दतीचा अवलंब केला जात आहे. रिव्हॅलो ॲपद्वारे फॉरेस्ट ट्रॅप पद्धतीने शोध घेतला जात आहे. या पध्दतीत नेमका कसा व किती किलोमीटर आणि कोणत्या क्षेत्रात शोध घेतला, याची बिनचूक नोंद होणार आहे. केवळ जखमी बिबट्यावर त्वरित उपचार व्हावे व जीव वाचावा, या एकमेव हेतूनेच नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर या शोधकार्यात केला जात आहे.