शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

शिवेंद्रसिंहराजे-शशिकांत शिंदे यांच्यात संघर्षाची ठिणगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:12 IST

सातारा : जिल्हा मध्यवर्ती बँकेचा बिगुल वाजण्याआधीच विविध पक्षांच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या तसेच टीका-टिप्पणीच्या फैरी झडू लागल्या आहेत. विधानसभा ...

सातारा : जिल्हा मध्यवर्ती बँकेचा बिगुल वाजण्याआधीच विविध पक्षांच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या तसेच टीका-टिप्पणीच्या फैरी झडू लागल्या आहेत. विधानसभा निवडणुकीमधील उट्टे काढण्याच्या उद्देशाने आता नेतेमंडळी एकमेकांवर जोरदार टीकास्त्र सोडताना पाहायला मिळतात. आगामी काळात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले विरुद्ध आमदार शशिकांत शिंदे असा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता दिसत आहे.

कुडाळ येथे झालेल्या मेळाव्यामध्ये आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडले होते.‘‘सातारा तालुक्यातील संघर्ष टाळण्यासाठी आम्ही भाऊ एकत्र आलो, हे काही जणांना सोसत नाही, त्यांच्या पोटात दुखायला सुरुवात झाली आहे. हीच मंडळी उदयनराजेंच्या आणि माझ्या कानाला लागून आमच्यात वाद निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, मी देखील भाऊसाहेब महाराजांचा मुलगा आहे, हे त्यांनी विसरू नये. ज्या उदयनराजेंना लोक घाबरतात, त्यांच्या विरोधात निवडणूक लढवून मी निवडून आलेला आहे. मी कुणालाही घाबरत नाही. मी संपलो तरी चालेल; पण माझ्या वाकड्यात शिरणाऱ्यांना मी संपवल्याशिवाय राहणार नाही’’, असे शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले होते.

याच पार्श्वभूमीवर नवी मुंबई येथे एका कार्यक्रमामध्ये आमदार शशिकांत शिंदे यांनीदेखील प्रसारमाध्यमांसमोर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘‘माझा आणि शिवेंद्रसिंहराजे यांचा कसलाही वाद नाही. तालुक्यातील कार्यकर्त्यांना मी भेटत असेल तर कोणाला त्रास होण्याची गरज नाही. सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची सूचना पक्षश्रेष्ठींनी केलेली असताना देखील मी कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. माझ्या मनात जर खोट असती तर मी सातारा-जावळी इथूनच लढलो असतो. आगामी काळामध्ये पक्षवाढीसाठी संघर्ष अटळ आहे. पक्षासाठी मला संघर्ष करावाच लागणार आहे.’’

दरम्यान, एकेकाळी एकाच पक्षामध्ये राहून जिल्ह्यातील सत्तास्थानांवर ताबा मिळवण्यासाठी एकत्र संघर्ष करणारे हे दोन्ही नेते आता एकमेकांच्या विरोधात बाह्या वर करून उभे आहेत. विधानसभेनंतर आता जिल्हा मध्यवर्ती बँकेचे रणांगण याला कारणीभूत आहे. राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेली जिल्हा मध्यवर्ती बँक खेचून भाजपच्या ताब्यात आणण्याचे धोरण भाजपने ठरवलेले आहे. राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यातील संघर्षाची किनार या वादामागे आहे. एकेकाळी एकमेकांचे मित्र असलेले नेते आता पक्षीय राजकारणाच्या संघर्षात भरडले जाताना दिसत आहेत.

काय म्हणाले होते हे नेते?

माझ्या मागं मला कोण त्रास देत असेल तर त्याला समोर जाऊन मी संपवणार. काटा काढण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर मी सुद्धा काट्याने काटा काढेन. कोणी आडगे असेल तर मी पण आडगा आहे.

- आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले

विधानसभा निवडणुकीमध्ये सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची सूचना मला होती. मात्र, माझ्या मनात कोणतीही खोट नव्हती. मी माझ्या कोरेगाव मतदारसंघातून निवडणूक लढवली. शिवेंद्रसिंहराजे यांच्याबद्दल माझ्या मनात कोणताही वैरभाव नाही. मात्र, आगामी काळात पक्षासाठी संघर्ष करावा लागणार आहे.

- आमदार शशिकांत शिंदे