शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
5
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
6
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
7
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
8
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
9
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
10
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
12
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
13
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
14
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
15
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
16
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
17
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
18
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
19
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
20
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
Daily Top 2Weekly Top 5

कोरड्या कोयनेत भरला ‘आठवणीतला बाजार’

By admin | Updated: July 3, 2014 00:49 IST

गावांचे अवशेष उघडे : बामणोली, शेंबडी परिसरात धरणापूर्वीच्या दिवसांना उजाळा

बामणोली : जून महिनाही कोरडा गेल्यामुळं ‘महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी’ मानल्या जाणाऱ्या कोयनेच्या शिवसागर जलाशयाची पातळी खूपच खालावली आहे. बामणोली परिसरातील जुन्या, पाण्याखाली गेलेल्या गावठाणांचे अवशेष उघडे पडले असून, पूर्वी कधीतरी ज्या ठिकाणी बाजार भरत होता, तिथेच मासेविक्रीसाठी विक्रेते बसत असल्यामुळे ‘आठवणीतला बाजार’ भरल्याचे दृश्य दिसत आहे.कोयनेच्या धरणामुळं निर्माण झालेल्या विस्तीर्ण अशा शिवसागर जलाशयात आणखी दोन नद्यांची खोरी समाविष्ट आहेत. तापोळ्याजवळ सोळशी नदी कोयनेला मिळते, तर शेंबडी गावाजवळ कांदाटी आणि कोयनेचा संगम आहे. कोयनेत थोड्या प्रमाणात पाणी असले, तरी सोळशी आणि कांदाटी नद्या पूर्ण कोरड्या पडल्या आहेत. सोळशी नदीच्या पात्रातून तापोळ्याला लोक चालत जाऊ शकत आहेत, इतकी पाण्याची पातळी खालावली आहे. लांबलेल्या पावसामुळं प्रत्येकजण निसर्गाच्या कृपेची वाट पाहत आहे, ही वस्तुस्थिती आहे. मात्र, बामणोली-शेंबडी भागात भात पिकाला जीवदान मिळण्यासाठी पावसाच्या प्रतीक्षेबरोबरच जुन्या आठवणीही जागविल्या जात आहेत.शिवसागर जलाशयाचं पाणी कमी झाल्यामुळं वीजनिर्मिती ठप्प झाली आणि नदीकाठच्या गावांत भाताची पिकंही पिवळी पडू लागली. शेतकरी हवालदिल होऊन पावसाची वाट पाहत आहेत. हा डोंगराळ टापू मुसळधार पावसासाठी प्रसिद्ध आहे. यंदा जुलै उजाडूनही पावसाची चिन्हे नाहीत. मात्र, या परिस्थितीचा जलाशयाच्या जवळ वसलेल्या गावांना थोडा फायदाही झाला आहे. पाणी कमी झाल्यामुळं मासे मोठ्या प्रमाणावर मिळत असून, मुंबई-पुण्याकडे रोज मासे पाठविले जात आहेत. माशांच्या राशी रचून जिथं विक्रेते बसत आहेत, त्याच ठिकाणी जुन्या बामणोली गावचा बाजार बसत असे. धरणाच्या निर्मितीनंतर प्रथमच त्या ठिकाणी आता ‘आठवणीतला बाजार’ भरत आहे.बामणोली गावात देशपांडे आडनावाच्या कुटुंबांची घरे जास्त होती. ब्राह्मण समाजातील इतरांचीही बरीच घरे होती. त्यामुळेच गावाला ‘बामणोली’ नाव पडल्याचं सांगितलं जातं. महात्मा गांधींच्या हत्येनंतर उद््भवलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर १९४८ मध्ये देशपांडे व अन्य ब्राह्मण कुटुंबांनी सांगली, मिरज, कुपवाडकडे स्थलांतर केलं. कालांतरानं कूळ कायद्यान्वये जमिनी वहिवाटदारांना मिळाल्या. आजही म्हावशी, बामणोली, सावरी गावांत काही जमिनींच्या सातबारावर देशपांडे आणि अन्य कुटुंबीयांची नावे आहेत, असं ग्रामस्थ सांगतात. कोयना धरण झाल्यावर बामणोली गावठाण पाण्यात गेलं आणि जलाशयाच्या कडेला नवीन बामणोली गाव वसलं. आता पाणी आटल्यावर जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आहे. (वार्ताहर)