शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

वगनाट्यात मनसोक्त हसल्या सखी..!

By admin | Updated: October 30, 2015 23:23 IST

विच्छा माझी पुरी कराचा प्रयोग : इरसाल ग्रामीण भाषेचा ठसका आणि लावणीच्या तडक्यामुळे हास्यकल्लोळ

सातारा : शहरी वातावरणात रुळलेल्या आणि येथील शुद्ध सात्विक भाषेत रमलेल्या शेकडो सखींना वग नाट्याने मनसोक्त हसविले. इरसाल ग्रामीण भाषेचा ठसका आणि लावणीचा तडका, यामुळे अवघे सभागृह हास्यकल्लोळात न्हाऊन निघाले.येथील शाहू कला मंदिरात ‘लोकमत’ सखी मंचच्या सदस्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या नाटकाचे उद्घाटन ‘लोकमत’चे संस्थापक संपादक व स्वातंत्र्यसेनानी दिवंगत जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेस अभिवादन करून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर प्रमोद जाधव, जगन्नाथ जंगम, शशिकांत ठेंगे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रायोजक ‘प्रकृती जियो फ्रेश’ होते.श्रीराम प्रॉडक्शन निर्मित आणि कर्मभूमी नाटसंस्था सातारा यांच्या वतीने खास ‘लोकमत’ सखींसाठी ‘विच्छा माझी पुरी करा’ या वग नाट्याचे आयोजन करण्यात आले होते. याचे लेखन वसंत सबनीस यांनी केले, तर दिग्दर्शन जगन्नाथ जंगम यांनी केले आहे. सातारा तालुक्यातील काशीळ या गावातील काही शेतकऱ्यांनी पेरणी ते काढणी या दरम्यान मिळणाऱ्या रिकाम्या वेळेचा सदुपयोग करत यात अभिनय केला असल्याचे निवेदन करताच सखींनी टाळ्यांच्या कडकडाटात या सर्वांचे कौतुक केले.श्री गणेशाला अभिवादन करून नाटकाची सुरुवात करण्यात आली. ‘कोणी तरी न्या हो मला फिरवायला’ आणि ‘दिलबरा करते तुला मुजरा’ या लावण्यांना सखींनी शिट्ट्यांची साद घातली. राजाचा दरबार, वंश परंपरेने मिळालेले युवराज पद, त्यामुळे प्रजेच्या प्रश्नांविषयीची अनास्था आदी अनेक विषय अत्यंत कुशलपणे विनोदी ढंगाने मांडले गेल्याने सखींनी मनापासून दाद दिली. शासकीय कर्मचारी म्हणून कायम उशिरा येणे आणि लवकर जाणे, कायम घडाळ्याकडे पाहून काम करणे, या मानसिकतेवरही या नाट्यात आसूड ओढण्यात आले. लोकांचे काहीही होवो, मी टिकलो पाहिजे, मी वाढलो पाहिजे, अशा संकुचित मनोवृत्तीत वावरणाऱ्या दुटप्पी भूमिका नाटकात प्रधानांनी सुयोग्य वठवली.कायम शुद्ध भाषा बोलण्याचा आग्रह धरणाऱ्या आणि चुकून एखादा इरसाल गावरान शब्द कोणी बोलला तर त्याच्याकडे विचित्रपणे पाहिले जाते; पण याच मराठी भाषेचे रांगडेपण आणि त्यातील नजाकतीमुळे शेवटपर्यंत सखी या प्रयोगात खिळून राहिल्या. (प्रतिनिधी)टाळ्यांचा कडकडाट आणि हास्याचे तुषारसंपूर्ण ग्रामीण भाषा आणि अधेमधे पेरलेले इंग्रजी शब्द यांच्या सुरेख मिश्रणामुळे सखींना भरभरून हसविले. चालू घडामोडींवर केलेले चपखल भाष्य सखींच्या टाळ्या मिळवून गेलं. तर बोलण्यातील हेल आणि ग्रामीण बाज यामुळे अनेक जणी पोट धरून हसल्या.