शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या ‘साताऱ्या’तून शिवसेनेचे दगडू सकपाळ

By admin | Updated: September 23, 2014 00:06 IST

उद्धव ठाकरेंचा निर्णय : दोन दिवसांत अर्ज भरण्याचा आदेश

सातारा : परळचे माजी आमदार दगडू सकपाळ यांची सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून सोमवारी रात्री उशिरा शिक्कामोर्तब झाले. दरम्यान, भाजपकडे असलेल्या मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार जाहीर झाल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.महायुतीचा तोडगा दृष्टिक्षेपात नसल्याचे स्पष्ट होताच उद्धव ठाकरेंनी राज्यातील बहुतांशी मतदारसंघांतील उमेदवारांची नावे निश्चित केली. रात्री उशिरा ‘मातोश्री’वर राजकीय खलबते वेगाने सुरू होती. उद्धव ठाकरे, खा. संजय राऊत, दिवाकर रावते यांची चर्चा झाल्यानंतर साताऱ्यातून माजी आ. दगडू सकपाळ यांचे नाव पुढे आले आणि त्यांना साताऱ्यातून शिवसेनेचे आपणच अधिकृत उमेदवार असून, दोनच दिवसांत जाऊन अर्ज भरण्याचे आदेशही दिले. सातारा-जावळी मतदारसंघ युतीच्या काळात भाजपकडे होता. मात्र, आता महायुतीतील गोंधळामुळे शिवसेनेचे दगडू सकपाळ यांच्या नावाची घोषणा झाली. सकपाळ शिवसेनेच्या स्थापनेपासून दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर कार्यरत राहिले आहेत. त्यांनी परळ विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व केले असून, ते मूळचे महाबळेश्वर तालुक्यातील अहिरे-वानवली (पूर्वी जावळी तालुका) येथील आहेत. २००८ च्या दरम्यान, ते सातारा जिल्हा संपर्कप्रमुखही होते. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी माझ्या उमेदवारीचा निर्णय घेतल्यामुळे मी आता सातारा-जावळी मतदारसंघातून लढणार आहे. माझ्या उमेदवारीची माहिती शिवसैनिकांना देण्यात आली आहे. दोनच दिवसांत मी साताऱ्यात येणार असून, शुक्रवारी अथवा शनिवारी अर्ज दाखल करणार आहे.- दगडू सकपाळ, माजी आमदारकऱ्हाड दक्षिण, उत्तरचा निर्णय अधांतरीसातारा जिल्ह्यातील उर्वरित मतदारसंघांच्या नावाबाबत रात्री उशिरापर्यंत खलबते सुरू होती. ‘मातोश्री’वरून मिळालेल्या माहितीनुसार, महाबळेश्वरचे माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर वाई, तर माजी आ. शंभूराज देसाई पाटण आणि फलटणमधून चंद्रकांत तासगावकर यांच्या नावाची घोषणा दोन दिवसांत होणार आहे. कोरेगावातून हणमंत चवरे, बाळासाहेब फाळके, दिनेश बर्गे यांच्यापैकी कोणाचे नाव निश्चित करायचे, यावर विचारमंथन चालले होते. कऱ्हाड उत्तर, कऱ्हाड दक्षिणच्या उमेदवारीचा निर्णय झाला नव्हता.