शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

पवारांच्या आव्हानामुळे शिंदेंचे बिनविरोध प्रयत्न फसले

By admin | Updated: April 27, 2015 00:19 IST

शिंदेंना सतावतेय मतफुटीची भीती : ४८ पैकी ४० हून अधिक मतदार मदत करणार!

दत्ता पवार - कुडाळ  -- जावळीत सोसायटी गटातून बिनविरोध जाण्याच्या दृष्टीने आमदार शशिकांत शिंदे यांनी ठराव प्रक्रियेपासून अधिक लक्ष घालून स्वत:ला सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला होता. अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच दीपक पवारांना सूचक, अनुमोदक मिळू नये, यासाठी मतदार सहलीवर पाठविण्यात आले. तरीदेखील दीपक पवारांच्या उमेदवारीमुळे आमदार शिंदे यांचे बिनविरोधचे स्वप्न भंगले. ही निवडणूक जरी एकतर्फी होणार, असे वाटत असले तरीदेखील मतफुटीची भीती आमदार शिंदेंना वाटत असल्यामुळे सहलीवरील मतदार आणखी काही दिवस सहलीवरच राहणार, हे निश्चित.जावळीत आमदार शशिकांत शिंदे यांचा मोठा गट आजही कार्यरत आहे, तर तालुक्यावर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचीदेखील मजबूत पकड असल्यामुळे सर्व संस्थांवर राष्ट्रवादीचीच सत्ता आहे. एकूण ४९ मतदार जिल्हा बँकेला आहेत. त्यापैकी सोमर्डी येथील धर्मराज परामणे यांच्या निधनामुळे मतदारांची संख्या ४८ वर आली आहे. दीपक पवारांनी जिल्हा परिषदेत विजय मिळविताना राष्ट्रवादीच्या काही मंडळींची त्यांना साथ मिळाली होती. तर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत देखील त्यांनी चांगले मतदान घेतल्यामुळे त्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा वाढलेली आहे. त्यामुळेच त्यांनी जिल्हा बँकेची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला.त्यांना सूचक, अनुमोदक म्हणून मोरावळे, सरताळे सोसायटी मतदारांचे सहकार्य लाभल्यामुळे त्यांनी आपला निवडणुकीचा निर्णय ठाम केला. सोसायटी ठरावात आमदार शिंदे यांनी आपल्याच मर्जीतील व्यक्तींचे ठराव केल्यामुळे ४८ पैकी ४० हून अधिक मतदार त्यांनाच मदत करणार, असे बोलले जात आहे. तरीदेखील राष्ट्रवादीतीलच काही मंडळींकडून दीपक पवारांना रसद पुरविली जात आहे. तर पवार हे सहलीवरील मतदारांच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आहेत, तर काही मतदारांच्या थेट संपर्कात असल्यामुळे अशा मतदारांकडून ‘वरून कीर्तन आतून तमाशा’ असे तर होणार नाही ना? अशीही शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आमदार शिंदेंना ताकही फुंकून प्यावे लागणार आहे. तर दुसरीकडे दीपक पवारांनी जिल्हा बँकेत तालुक्यातील सुशिक्षितांनापेक्षा कोरेगाव तालुक्यातील अधिक सुशिक्षितानांच नोकरीची संधी मिळाली. यासह अनेक भावनिक मुद्दे घेऊन त्यांनी प्रचार सुरू केला आहे. त्यामुळे आमदार शिंदेंची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे. सुनेत्रा शिंदेंची बंडखोरी विद्यमान संचालिका सुनेत्रा शिंदे यांना महिला गटातून राष्ट्रवादीने डावलल्यामुळे त्यांनी आपला अर्ज कायम ठेवून बंडखोरी केली आहे. तर त्यांना राष्ट्रवादीच्याच बड्या नेत्यांचे सहकार्य लाभत आहे. तर त्यांच्या उमेदवारीमुळे आमदार शिंदेंच्या समोरील अडचणी वाढल्या आहेत.