शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
3
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
4
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
5
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
6
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
7
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
8
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
9
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
10
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
11
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
12
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
13
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
14
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
15
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
16
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
17
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
18
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
19
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
20
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शंभूराज देसार्इंची बोटे तुपात, पाटणकरांची भिस्त सभापतींवर !

By admin | Updated: November 6, 2014 22:06 IST

पाटण तालुका : बाजी पलटली, विकासाचे काय?

पाटण : तालुक्यात सत्ता बदलचे वारे वाहू लागले असून, देसाई-पाटणकरांच्या लढाईत आता बाजी पलटली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आमदारकी व पंचायत समितीची सत्ता उपभोगणाऱ्या पाटणकर गटावर आता केवळ पंचायत समितीतील सभापतिपदावर आपली हुकूमत पुढील पाच वर्षे चालू ठेवावी लागेल, तर आमदारकी, साखर कारखाना, पंचायत समिती, उपसभापतिपद अशी पाच ही बोटे तुपात असणाऱ्या देसाई गटाला चांगली उभारी आली आहे.मात्र, सत्ता असूनही ती राबविता येत नाही, असा पूर्वानुभव पाहता तालुक्यात पलटलेल्या बाजीतून विकासाचे काय होणार? याकडे लक्ष लागले आहे.पाटण तालुका हा तारळे, ढेबेवाडी, मोरणा, कोयना, चाफळ, कुंभारगाव यासारख्या विभागांनी विखुरला आहे. मात्र, तहसील कार्यालय, पंचयात समिती, पोलीस ठाणे यासारखी मुख्य कार्यालये पाटण शहरात आहेत. त्यामुळे २५ वर्षे आमदारकी राखणाऱ्या पाटणकरांचे वर्चस्व आजही या कार्यालयांवर दिसून येते. त्यामुळे सत्ता असो, वा नसो. ती कशी गाजवायची याची गणित नेमकी पाटणकर सोडवितात. याचं उदाहरण म्हणजे, देसाई गटाचा सभापती असताना पंचायत समितीच्या पशुसंवर्धन इमारतीचे उद्घाटन पाटणकरांनी मोठ्या कौशल्याने केले, तर विधानसभा निवडणुकीत पराभव झाला असतानाही विक्रमसिंह पाटणकर यांनी नव्याने बांधकाम सुरू असणाऱ्या पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीची पाहणी करून नवीन आमदार शंभूराज देसार्इंना सत्ता राबविता येत नाही, हे दाखवून दिले. आता आगामी पाच वर्षांत याच चाली पाटणमध्ये दिसणार आहेत. त्यामुळे शंभूराज देसार्इंना मोठी व्यूहरचना करावी लागणार आहे. (प्रतिनिधी)पाटणकर गटाची सभापत्)िापदावर ओळख...पाटणकर गटाला आपले अस्तित्व पुढील पाच वर्षे टिकवून ठेवण्यासाठी केवळ सभापतिपदावर आपली ओळख टिकवून ठेवण्याचे प्रयत्न करावे लागणार आहेत. शंभूराज देसाई आपल्या आमदारकीवर काय काम करतात, हे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यावरून तालुक्याचा विकास अवलंबून आहे.