साताऱ्यात शाळेतील महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:38 IST2021-07-29T04:38:49+5:302021-07-29T04:38:49+5:30

सातारा : मी तुला दुपटीने पैसे देतो, तू माझ्याशी शारीरिक संबंध ठेव, असं म्हणून शाळेतील एका कर्मचारी महिलेचा ...

Sexual harassment of female school staff in Satara | साताऱ्यात शाळेतील महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग

साताऱ्यात शाळेतील महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग

सातारा : मी तुला दुपटीने पैसे देतो, तू माझ्याशी शारीरिक संबंध ठेव, असं म्हणून शाळेतील एका कर्मचारी महिलेचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून शाहूपुरी पोलीस ठाण्यात तिघांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नारायण बद्रू चव्हाण (वय ४८), प्रकाश नारायण चव्हाण (वय २६, रा. समता पार्क, शाहूपुरी सातारा), सोहेल रियाज खान (वय २५, रा. शाहू कलामंदिर शेजारी सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित महिला एका शाळेत नोकरी करते. दि. २५ रोजी संबंधित महिला घरात होती. त्या वेळी तिचा मुलगाही घरात होता. या वेळी हे वरील संशयित तिघे तिच्या घरात जबरदस्तीने शिरले. मेन दरवाजाचा कडीकोयंडा तोडून ते घरात शिरले. यातील संशयित नारायण चव्हाण हे तिला “मी तुला दुपटीने पैसे देतो, तू माझ्याशी शारीरिक संबंध ठेव,” असे म्हणाले तर शेख याने तिला नारायण चव्हाण यांच्या अंगावर ढकलून दिले व “तो म्हणतो तसं ऐक, नाहीतर तुला तुझी रक्कम परत मिळणार नाही,” अशी धमकी दिली. त्यानंतर धक्काबुक्की करून “तू जर आमची तक्रार केली तर तुझ्याविरुद्ध खोटी तक्रार करू तसेच तुझी सरकारी नोकरी घालवू,” अशी धमकी देऊन अश्लील भाषेत शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मारहाणीत किरकोळ मुका मार लागला. हा प्रकार सुरू असताना पीडितेच्या घरात स्वयंपाक करायला आलेली महिला व कपडे शिवण्यासाठी नेहमी येत असणारी महिला घराबाहेर आली असता संशयित भिंतीवर थुंकून पळून गेले. या प्रकारानंतर पीडित महिलेने शाहूपुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली.

Web Title: Sexual harassment of female school staff in Satara