शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

पीरवाडीत युवकावर सत्तूरने हल्ला

By admin | Updated: July 11, 2014 23:17 IST

चौघांवर गुन्हा : दुचाकीच्या कारणावरून घडला प्रकार

सातारा : येथील पीरवाडी चौकात ‘दुचाकी हळू चालवत जा,’ असे म्हटल्याच्या कारणावरून एका युवकाच्या डोक्यात सत्तूरसारख्या हत्याराने हल्ला करण्यात आला आहे. याप्रकरणी पीरवाडीच्या चौघांजणांवर गुन्हा नोंद झाला आहे. दरम्यान, जखमी असणाऱ्या विजय कालिदास जगताप याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गुरुवार दि. १० रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास विजय जगताप (वय २३, रा. उत्तेकरवाडा, पीरवाडी सातारा) हा युवक त्याच्या दोघा मित्रांबरोबर घरी पायी जात होता. यावेळी सिद्धिकी जलालुद्दीन खान (रा. पीरवाडी) हा विजयच्या समोरून दुचाकीवरून येऊन जवळून गेला. पुढे जाऊन खान याने दुचाकी थांबविली. त्यावेळी विजयने माघारी वळून पाहिले. त्यामुळे खानने विजयला ‘रस्त्यातून बघून चालत जा,’ असे सांगितले. त्यावर विजयने खानला गाडी हळू चालविण्यास सांगितले. यामधून दोघांत कुरबूर वाढली. त्यावेळी खानने विजयला बघून घेण्याची धमकी दिली.रात्री साडेआठच्या सुमारास सिद्धिकी खानबरोबर काहीजण आले. त्यांनी ‘चौकात बोलूया’ म्हणून विजय व त्यांच्या मित्रांना बोलावून घेतले. पीरवाडी चौकात ‘गेल्यावर उलटा का बोलतोस’ म्हणून विजय व त्याच्या मित्राला मारहाण करण्यात आली. यावेळी विजयच्या डोक्यात सलमान मुजावरने सत्तूरसारख्या हत्याराने वार केला तर त्याचवेळी कोणीतरी फरशीने विजयला मारहाण केली. यावेळी आरडाओरडा झाल्यानंतर संशयित पळून गेले.याबाबत विजय जगताप याने तक्रार दिली आहे. त्याच्या तक्रारीनंतर सिद्धिकी खान, तन्वीर शेख, इजाज काझी आणि सलमान मुजावर (सर्व रा. पीरवाडी) यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे. यामधील दोघांना अटक करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)