शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

सातारकरांची यंदाही करवाढीतून सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:51 IST

सातारा : पालिकेतील सातारा विकास आघाडीच्या सत्ताधाऱ्यांनी २०२०-२१ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकाला विरोधकांच्या उपसूचना स्वीकारत मंजुरी दिली. शुक्रवारी झालेल्या ...

सातारा : पालिकेतील सातारा विकास आघाडीच्या सत्ताधाऱ्यांनी २०२०-२१ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकाला विरोधकांच्या उपसूचना स्वीकारत मंजुरी दिली. शुक्रवारी झालेल्या पालिकेच्या विशेष सभेत उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी ३०७ कोटी ४७ लाख ६६ हजार ४२४ रुपयांचा अर्थसंकल्प सभागृहापुढे मांडला. गतवर्षीप्रमाणे यंदाही पाणी व घरपट्टीत कोणतीही करवाढ केली नसल्याने हा अर्थसंकल्प सातारकरांना दिलासा देणारा ठरेल, असा विश्वास उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी व्यक्त केला.

सातारा पालिकेची अंदाजपत्रकीय सभा नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन पद्धतीने पार पडली. विरोधी पक्षनेता अशोक मोने, नगरसेवक वसंत लेवे, अविनाश कदम, शेखर-मोरे पाटील आदींनी या अर्थसंकल्पाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत उपसूचना मांडल्या. कोरोनामुळे नगरविकास विभागाने प्रत्यक्ष सदस्यांच्या उपस्थिती सभा, बैठका घेण्यास निर्बंध घातले आहेत. त्यामुळे पालिकेची अंदाजपत्रकीय सभा वेबेक्स प्रणालीद्वारे ऑनलाईन घेण्यात आली. साविआ, नविआ व भाजप तीन्ही आघाडीच्या नगरसेवकांनी सभेला ऑनलाईन उपस्थिती दर्शविली.

खासदार उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा विकास आघाडीने गेल्या चार वर्षांत मार्गी लावलेल्या व नियोजित विकासकामांचा आढावा नगराध्यक्षा माधवी कदम यांनी घेतला. यानंतर सभेला सुरुवात झाली. अंदाजपत्रक मांडताना उपनगराध्यक्ष मनोज शेंडे म्हणाले, यंदाच्या अंदाजपत्रकात पाणी व घरपट्टीत कोणतीही वाढ करण्यात आली नाही. सातारकरांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या कास धरण, भुयारी गटार योजना, अमृत योजना, अजिंक्यतारा किल्ला विकास तसेच हद्दवाढीतील मूलभूत सुविधांचा अंतर्भाव या अंदाजपत्रकात केला आहे. याव्यतिरिक्त शहरातील क्रीडांगणे, बाजारपेठ व उद्यानांचा विकासही केला जाईल. कोरोनामुळे प्रलंबित असलेल्या विकासकामांना निधीची तरतूद करून ती कामे मार्गी लावली जातील. महसूल वाढीच्या दृष्टीनेही उपाययोजना केल्या जातील.

दरम्यान, अंदाजपत्रकाच्या पुस्तकात गोषवारा पत्रक नसल्याने विरोधी पक्षनेता अशोक मोने यांनी प्रशासनाचा समाचार घेतला. या चुकीबद्दल लेखापाल आरती नांगरे यांनी सभागृहापुढे दिलगिरी व्यक्त केली. शिलकी अंदाजपत्रक सादर करताना करवसुलीचे मोठे आव्हान आहे. हद्दवाढीनंतर महसुली भांडवली अनुदानामुळे पालिकेचे बजेट तीनशे कोटींचा टप्पा ओलांडून गेलेला असताना घर व पाणीपट्टीचे निव्वळ उत्पन्न १९ कोटी ७५ लाख रुपयांवर मर्यादित राहिल्याने पालिकेचा खिसा रिकामा होण्याची वेळ आल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. दोन तासांच्या ऑनलाईन सभेत चर्चा कमी, तांत्रिक त्रुटींचा गोंधळच समोर आला. त्यामुळे अंदाजपत्रकातील तरतुदींवर तपशीलवार चर्चा झाली नाही. विरोधकांच्या उपसूचना स्वीकारत तब्बल ३०७ कोटी ४७ कोटी ६६ हजार ४२४ रुपयांचा अर्थसंकल्प सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

(चौकट)

कोण काय म्हणाले

माधवी कदम : बिगरनिवासी मिळकतींना घरपट्टी माफी देण्यासंदर्भात खा. उदयनराजे भोसले नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार आहेत.

मनोज शेंडे : हद्दवाढीच्या क्षेत्रासाठी पायाभूत सुविधांकरिता बावीस कोटी रुपयांचा डीपीआर तयार करण्यात आला आहे.

वसंत लेवे : महानुभव मठ येथील पालिकेच्या मालकीच्या जागेबाबत उच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. त्याबाबत नगरपरिषदेने काय कार्यवाही केली.

अविनाश कदम : पालिकेचे बजेट हे कॉपी-पेस्ट बजेट आहे. केवळ आकडे फुगविण्यात आले आहे. उत्पन्नवाढीकडे दुर्लक्ष केले आहे.

अशोक मोने : दिवंगत अभयसिंहराजे भोसले यांच्या नावाने सुरू करण्यात आलेली शिष्यवृत्ती बंद करण्यात आली.

(चौकट)

काय होते विरोधकांचे मुद्दे?

- अंदाजपत्रकाच्या पुस्तकात गोषवारा पत्रक नसणे ही नक्की कोणाची चूक

- महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची कोट्यवधींची देणी बाकी असताना हा अर्थसंकल्प शिलकी कसा?

- मुदत संपलेले गाळे व इमारतींचा फेरलिलाव झालेला नाही

- हुतात्मा स्मारक व सदर बझार येथील अग्निशमन केंद्र कार्यान्वित नसताना त्यावर कोट्यवधींचा खर्च कसा

- उत्पन्नवाढीच्या बाबीकडे पूर्णत: दुर्लक्ष. हद्दवाढीतील विकासकामांसाठी निधीची अभाव

- जुना राजवाडा पालिकेच्या मालकीचा नसताना आर्ट गॅलरीसाठी २ कोटी २५ लाखांची तरतूद

- गणेशोत्सवात आतापर्यंत कोट्यवधींचा खर्च होत असताना, पालिका स्वमालकीचे तळे का उभारत नाही

- घरपट्टी माफी कोणाला केली, तिचा कालावधी याचा कुठेही उल्लेख नाही

(चौकट)

नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाची कामे

- कास तलाव उंची वाढविणे

- भुयारी गटार योजना, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प

- उद्यानांची देखभाल, राजवाडा येथे आर्ट गॅलरी

- अजिंक्यतारा विकास व स्मृती उद्यान नूतनीकरण

- कर्नल संतोष महाडिक स्मारक

- क्रीडांगण विकसित करणे

- हद्दवाढीत रस्ते, नाले, गटारी, वीज अशा मूलभूत सुविधा पुरविणे

- विद्यार्थी, महिलांसाठी स्वामी विवेकानंद व जिजाऊ पुरस्कार

(चौकट)

असा येणार रुपया

नगरपालिका कर १२ पैसे

महसुली अनुदाने १६ पैसे

भांडवली अनुदाने ४७ पैसे

नगरपालिका मालमत्ता फी ३ पैसे

व्याज व विलंब आकार २ पैसे

इतर उत्पन्न १ पैसे

ठेवी डिपॉझिट ९ पैसे

(चौकट)

असा जाणार रुपया

आस्थापना खर्च १८ पैसे

दुरुस्ती देखभाल ३ पैसे

आरोग्य सुविधा २ पैसे

पाणी पुरवठा २ पैसे

शिक्षण १ पैसे

विकास कामे ६८ पैसे

संकीर्ण खर्च १ पैसे

असाधारण खर्च ५ पैसे

फोटा : २६ जावेद १८

सातारा पालिकेची अंदाजपत्रकीय सभा शुक्रवारी पार पडली. या सभेत उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी अंदाजपत्रक ऑनलाईन सादर केेले. (छाया : जावेद खान)