शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
3
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
5
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
6
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
7
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
8
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
9
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
10
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
11
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
12
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
13
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
14
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
15
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
16
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
17
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
18
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
19
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
20
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
Daily Top 2Weekly Top 5

वहिनीचा ओरडण्याचा आवाज आला अन् लोक धावले, वाईत दीराचं भयानक कृत्य पाहून गाव सुन्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 14:24 IST

साताऱ्यात जमिनीच्या वादातून एका महिलेची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

Satara Crime: जमीन विक्रीच्या कारणातून दीराने भावजयीवर धारदार शस्त्राने हल्ला करून तिचा निर्घृण खून केला. ही धक्कादायक घटना वाई तालुक्यातील बालेवाडी येथे मंगळवारी सकाळच्या सुमारास घडली. या घटनेनंतर वाई पोलिसांनी दिराला तातडीने ताब्यात घेऊन अटक केली.

भिकू विठ्ठल यादव (५५) असे पोलिसांनी अटक केलेल्या दिराचे तर गीताबाई चंद्रकांत यादव (४५) असे मृत भावजयीचे नाव आहे. वडिलोपार्जित शेतजमिनीच्या विक्रीवरून यादव कुटुंबात मागील काही दिवसांपासून वाद सुरू होता. भिकू यादव हा वारंवार जमीन विकण्यासाठी दबाव टाकत होता. मात्र भाऊ व भावजयीने जमीन विकण्यास नकार दिला होता. यावरून शिकू यादव चिडून होता.

दरम्यान मंगळवारी २८ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास भीकू यादव याने भावजयीवर धारदार शस्त्राने हल्ला केला. भावजयीचा ओरडण्याचा आवाज आल्याने उपस्थितांनी घरात घाव घेतली. त्यावेळी भिकू यादव हा धारदार शस्त्राने भावजयीवर वार करत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी पाहिले. उपस्थितांना पाहताच त्याने घटनास्थळावरून पलायन केले.

या घटनेनंतर गीताबाई यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. पती चंद्रकांत विठ्ठल यादव यांत्री वाई पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, वाई पोलिस पुढील तपास करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Brother-in-law kills sister-in-law over land dispute in Wai; village shocked.

Web Summary : A brother-in-law fatally attacked his sister-in-law in Balewadi, Wai, due to a land dispute. Bhiku Yadav, the brother-in-law, repeatedly pressured her to sell ancestral land, which she refused. He was arrested; the victim, Geetabai Yadav, died before receiving treatment.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसरPoliceपोलिस