शहरं
Join us  
Trending Stories
1
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
2
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
3
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
4
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
5
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
6
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
7
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
8
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
9
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
10
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
11
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
12
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
13
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
14
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
15
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
16
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
17
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
18
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
19
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
20
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली

सातारा : तडीपार आरोपी पिंटू बुधावले पोलिसांच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 1:52 PM

हद्दपार आदेशाचे उल्लंघन केलेला तडीपार आरोपी पिंटू उर्फ दीपक सर्जेराव बुधावले (रा. अपशिंगे, नवलेवाडी ता. कोरेगाव) याला रहिमतपूर पोलिसांनी शुक्रवारी पहाटे सव्वासहाच्या सुमारास सापळा रचून अटक केली. ही कारवाई अपशिंगे येथील घाडगे वस्तीवर केली.

ठळक मुद्देतडीपार आरोपी पिंटू बुधावले पोलिसांच्या जाळ्यातअपशिंगे येथील घाडगे वस्तीवर केली कारवाई

रहिमतपूर (सातारा) : हद्दपार आदेशाचे उल्लंघन केलेला तडीपार आरोपी पिंटू उर्फ दीपक सर्जेराव बुधावले (रा. अपशिंगे, नवलेवाडी ता. कोरेगाव) याला रहिमतपूर पोलिसांनी शुक्रवारी पहाटे सव्वासहाच्या सुमारास सापळा रचून अटक केली. ही कारवाई अपशिंगे येथील घाडगे वस्तीवर केली.याबाबत माहिती अशी की, पोलिसांनी दाखल केलेल्या विविध गुन्ह्यांत अपशिंगे (नवलेवाडी) येथील तडीपार आरोपी पिंटू उर्फ दीपक सर्जेराव बुधावले याला २६ जानेवारी २०१७ रोजी सातारा, सांगली, सोलापूर या तीन जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी हद्दपार केले आहे. तडीपारीच्या आदेशाचे यापूर्वीही उल्लंघन केल्याने रहिमतपूर पोलिसांनी त्याला पकडण्याचा केलेला प्रयत्न अयशस्वी झाला होता.

पिंटू आपल्या गावी राहत्या घरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, मंगळवार, दि. ३ रोजी पहाटे छापा टाकण्यासाठी गेलेल्या रहिमतपूर पोलिसांवर बुधावले परिवाराने दगड व ढेकळाने हल्ला केला. त्यात तीन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले. या गोंधळाचा फायदा घेऊन आरोपी दुसऱ्यांदा पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाला होेता.

तो अपशिंगे येथील घाडगे वस्तीवर झोपला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मात्र, आरोपी वारंवार चकमा देत असल्याने साहायक पोलीस निरीक्षक श्रीगणेश कानगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी शुक्रवारी पहाटेच नियोजनबद्ध छापा टाकून बुधावले याला झोपेतच ताब्यात घेतले.

या कारवाईत पोलीस हवालदार प्रकाश इंगळे, विजय जाधव, रवींद्र कापले, पोलीस नाईक जगदीश कणसे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन राठोड, सागर भुजबळ, समाधान निकम, सागर पाटील, आरती यादव, शिल्पा जाधव, नीता घाडगे आदींनी सहभाग घेतला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrimeगुन्हाPoliceपोलिस