तडीपार आरोपी पुरवतोय गांजा

By admin | Published: September 20, 2016 03:17 AM2016-09-20T03:17:03+5:302016-09-20T03:17:03+5:30

एपीएमसीमध्ये दोन दशकांपासून गांजा विक्री करणाऱ्या हरिदास विधाते ऊर्फ टारझनला अटक केली

The accused has provided the accused Ganja | तडीपार आरोपी पुरवतोय गांजा

तडीपार आरोपी पुरवतोय गांजा

Next


नवी मुंबई : एपीएमसीमध्ये दोन दशकांपासून गांजा विक्री करणाऱ्या हरिदास विधाते ऊर्फ टारझनला अटक केली असली तरी त्याचे एमआयडीसी परिसरातील अड्डे अद्याप सुरूच आहेत. वारली पाड्याजवळ एका झोपडीमध्ये गांजा विक्री केली जात असल्याचे लोकमतच्या पाहणीमध्ये आढळून आले आहे.
अमली पदार्थमुक्त नवी मुंबई करण्यासाठी लोकमतने मोहीम हाती घेतली आहे. गांजासह इतर अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात मोहीम सुरू केल्यानंतर पोलिसांनीही शहरात धाडसत्र सुरू करून आतापर्यंत २१ आरोपींना अटक केली आहे. यामध्ये एपीएमसीमधील गांजा माफिया टारझनचाही समावेश आहे. टारझन तुरूंगात गेला तरी त्याचे नेटवर्क अद्याप सुरूच असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तुर्भे ते महापे रोडवर वारलीपाड्याजवळील झोपडीमध्ये एका वृद्ध महिलेकडून गांजा विक्री करून घेतली जात आहे. यापूर्वी ८० ते १०० रूपयांना विकली जाणारी गांजाची पुडी पोलिसांच्या धाडसत्रामुळे १२० ते १५० रूपयांना विकली जात आहे. या परिसरातील कंपन्यांमध्ये नेपाळ, आसाम व इतर ठिकाणावरून शेकडो मजूर कामासाठी आले आहेत. या कामगारांना गांजा पुरविण्यात येत असल्याचे निदर्शनास आले.
लोकमतच्या टीमनेही मागणी करताच त्यांना पैसे घेवून पुडी देण्यात आली. गांजा खरेदीसाठी आलेल्या दोन तरूणांना विचारणा केली असता आठवड्यातून दोन ते तीन वेळा आम्ही येथून खरेदी करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
एमआयडीसीमधील सदर महिलेलाही टारझनशी संबंधित व्यक्तीच गांजा पुरवत असल्याचे बोलले जात आहे. त्याचा मुलगा दत्ता विधाते यालाही एपीएमसी पोलिसांनी यापूर्वी अटक करून त्याला तडीपार केले होते. परंतु तडीपार केल्यानंतरही तो नवी मुंबईमध्ये वास्तव्य करत आहे. त्याचा तडीपारीचा कालावधी संपला नसल्याचे बोलले जात असून पोलीस त्याची चौकशी करणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या परिसरातील दक्ष नागरिकांनीही परिसरातील गांजा विक्री व इतर सर्व अवैध व्यवसाय थांबविण्यात यावेत, अशी मागणी केली आहे. (प्रतिनिधी)
>‘लोकमत’चे आभार
अमली पदार्थांविरोधात ‘लोकमत’ने आवाज उठविल्यानंतर पोलिसांनीही अनेक आरोपींना गजाआड केले आहे. सीवूडमध्ये लहान मुले अमली पदार्थांच्या विळख्यात अडकली असल्याचे वृत्त प्रसिद्ध केल्यामुळे उद्यानांमधील टपोरींचा वावर थांबला आहे. यामुळे परिसरातील रहिवाशांनी ‘लोकमत’चे आभार मानले असून हार्डवेअर व इतर दुकानांमध्ये जावून लहान मुलांना स्पेब ७ ची विक्री करू नये, असे आवाहन केले आहे.

Web Title: The accused has provided the accused Ganja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.