लाइव न्यूज़
 • 04:29 PM

  गुजरात विधानसभा निवडणूक 2017- मला वाटतंय एग्झिट पोल चुकीचे ठरतील. जर ईव्हीएमसोबत काही गडबड केली नाही तर भाजपा पराभूत होईल- हार्दिक पटेल.

 • 04:02 PM

  मध्य रेल्वेची वाहतूक 20-25 मिनिटं उशिराने. अंबरनाथ-बदलापूरदरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड.

 • 04:00 PM

  यवतमाळ : पुसद-हिंगोली मार्गावरील रोहडा गावात एसटी बस उलटली. स्टेअरिंगचा रॉड तुटल्याने शनिवारी अपघात. ४० प्रवासी जखमी.

 • 03:55 PM

  पश्चिम मेघालय आणि शिलाँगमधून तुराला जोडणा-या राष्ट्रीय महामार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रार्पण केले.

 • 03:30 PM

  बीड - परळी येथे थकीत वीज बिलाच्या वसुलीसाठी 150 अधिकारी- कर्मचारी वीज ग्राहकांच्या घरी जाऊन करणार वसुली.

 • 02:42 PM

  सोलापूर - राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्ष पदाची धुरा सांभाळली त्यानिमित्त सोलापूर कॉँग्रेस भवन कार्यालयासमोर जल्लोष.

 • 02:31 PM

  सर्व विद्यार्थ्यांना पुरवणी देण्याचा मुंबई विद्यापीठाचा निर्णय.

 • 02:21 PM

  संत्र्याला प्रक्रियेच्या माध्यमातून शाश्वत मार्केट मिळेल, नोगाचे पुनरुज्जीवन करण्यात येईल, शासन 49 टक्के भागीदारी करेल - देवेंद्र फडणवीस.

 • 02:20 PM

  वर्ल्ड ऑरेंज फेस्टिवल ऐतिहासिक पाऊल, संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे - देवेंद्र फडणवीस.

 • 01:35 PM

  श्री सिद्धीविनायक गणपती मंदिर प्रभादेवी यांच्याकडून ठाणे जिल्ह्यातील जलयुक्त शिवार अभियानासाठी 1 कोटी रुपयांचा धनादेश आज जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांना देण्यात आला.

 • 01:22 PM

  वर्ल्ड ऑरेंज फेस्टिवलमुळे नागपूरची ओळख जगभरात होईल - गजेंद्रसिंह शेखावत

 • 01:12 PM

  अहमदनगर - जामखेड तालुक्यात नऊ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर नातेवाईकाकडूनच अत्याचार, आरोपीच्या विरोधात पत्नीनेच दिली फिर्याद.

 • 01:12 PM

  पुढील पाच वर्षात वर्ल्ड ऑरेंज फेस्टिवल जगातील महत्वाचा उत्सव बनेल, जगभरातून येथे लोक येतील, संत्र्यावर संशोधन व्हावे : विजय दर्डा.

 • 01:02 PM

  सरकार राईट टू एज्युकेशन अॅक्ट आणते पण राईट टू हेल्थ अॅक्ट आणू शकत नाही ही या देशाची शोकांतिका आहे - डॉ. रवी वानखेडकर.

 • 01:01 PM

  नागपूर - वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलचे उदघाटन, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित.

All post in लाइव न्यूज़