शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
5
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
6
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
7
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
8
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
9
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
11
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
12
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
13
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
14
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
15
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
16
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
17
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
18
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
19
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
20
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
Daily Top 2Weekly Top 5

Satara: काँग्रेसला माण सोडाच, भाजप परत दिसणार नाही; केंद्रीय निरीक्षकांपुढे जोरदार मागणी 

By नितीन काळेल | Updated: October 9, 2024 19:21 IST

उमेदवाराच्या विजयाची जबाबदारीही घेतली 

सातारा : काँग्रेसच्या जिल्हा बैठकीत माणविधानसभा मतदारसंघाची मागणी अनेकवेळा झाली असून, बुधवारीही माढा लोकसभा मतदारसंघासाठी नियुक्त केंद्रीय निरीक्षकांकडेही माणची मागणी जोरदार करण्यात आली. तसेच या मतदारसंघात काँग्रेस लढली तर विजयी होईल. पण, भाजप परत दिसणारही नाही, असा दावाही करण्यात आला. यामुळे माण मतदारसंघ काँग्रेसला मिळणार का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.विधानसभा निवडणुकीचे बिगुल कधीही वाजू शकते. यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीतूनही जागा वाटपावर भर देण्यात येत आहे. पण, अजूनही सातारा जिल्ह्यातील विधानसभेच्या काही मतदारसंघाबाबत आघाडीत संभ्रमावस्था आहे. काँग्रेसने तीन मतदारसंघावर दावा केला आहे. तर उद्धव सेनाही निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने मंगळवारीच इच्छुकांच्या मुलाखती पार पाडल्या आहेत. काँग्रेसही अधिक जागा पदरात पाडून घेण्याच्या प्रयत्नात आहे.असे असतानाच माढा लोकसभा मतदारसंघाचे केंद्रीय निरीक्षक व गुजरातमधील आमदार अमरित ठाकूर यांनी जिल्हा काँग्रेस कमिटीत माण आणि फलटण विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या. यावेळी जिल्हाध्यक्ष डाॅ. सुरेश जाधव, महिला जिल्हाध्यक्षा अल्पना यादव, सरचिटणीस नरेश देसाई, रणजितसिंह देशमुख, प्रा. विश्वंभर बाबर, डाॅ. महेश गुरव आदी उपस्थित हाेते.

बैठकीत केंद्रीय निरीक्षक ठाकूर यांनी मतदारसंघाचा आढावा घेतला. त्यानंतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या. यामध्येच माण मतदारसंघातील पदाधिकारी आक्रमक आणि मुद्देसूदपणे मांडणी करत होते. माणमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्येच लढाई आहे. यामध्ये भाजप पराभूत होईल. कारण, काँग्रेसने अनेक निवडणुका लढवून जिंकल्या आहेत. काँग्रेस मजबूत असल्याने पहिल्याच यादीत माणच्या उमेदवाराचे नाव जाहीर करावे. विजयाची जबाबदारी आमची, असेही स्पष्ट करण्यात आले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक 2024congressकाँग्रेसman-acमाण