शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

जमिनीचा मोबदला न मिळाल्याने रस्ता ट्रक्टरने खोदला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 19:54 IST

Road Satara : वळसे (ता. सातारा) येथून बिव्हीजी फूड पार्ककडे जाणाऱ्या रस्त्यासाठी जमिनी घेऊनही अद्याप त्याचे पैसे न मिळाल्याने संतप्त बाधित शेतकऱ्यांनी रस्त्यावर चर मारून तो काही काळासाठी बंद केला. ही घटना शुक्रवारी सकाळी घडली. जमिनीचे पैसे लवकरात लवकर मिळावेत अन्यथा हा रस्ता कायमस्वरूपी बंद करून वाहिवाटीस पुन्हा ताब्यात घेण्यात येईल असा इशारा शिवाजी राजाराम कदम, परशुराम विठोबा कदम, संतोष विठ्ठल कदम,नवनाथ विठ्ठल कदम व धनाजी विठ्ठल कादम या बाधित शेतकऱ्यानी दिला आहे.

ठळक मुद्देजमिनीचा मोबदला न मिळाल्याने रस्ता ट्रक्टरने खोदला वळसेत आंदोलन : वेळेवर मोबदला न मिळाल्यास कायमचा रस्ता बंद करण्याचा इशारा

नागठाणे : वळसे (ता. सातारा) येथून बिव्हीजी फूड पार्ककडे जाणाऱ्या रस्त्यासाठी जमिनी घेऊनही अद्याप त्याचे पैसे न मिळाल्याने संतप्त बाधित शेतकऱ्यांनी रस्त्यावर चर मारून तो काही काळासाठी बंद केला. ही घटना शुक्रवारी सकाळी घडली. जमिनीचे पैसे लवकरात लवकर मिळावेत अन्यथा हा रस्ता कायमस्वरूपी बंद करून वाहिवाटीस पुन्हा ताब्यात घेण्यात येईल असा इशारा शिवाजी राजाराम कदम, परशुराम विठोबा कदम, संतोष विठ्ठल कदम,नवनाथ विठ्ठल कदम व धनाजी विठ्ठल कादम या बाधित शेतकऱ्यानी दिला आहे.याबाबत माहिती अशी की, बिव्हीजीच्या फूड पार्कसाठी जाणाऱ्या रस्त्यासाठी वळसे येथील काही शेतकऱ्यांच्या जमिनी शासनाने संपादित केल्या. वळसे येथून महादेव मंदिर मार्गे डोंगरातून हा रस्ता देगाव हद्दीत असलेल्या फूड पार्कसाठी तयारही करण्यात आला. त्यानंतर तीन वर्षांपासून या रस्त्यावरून वाहतूक सुरू आहे. मात्र या रस्त्यासाठी वळसे गावातल्या ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या आहेत. त्यांना अद्यापही कोणताच मोबदला मिळाला नाही.

या बाधित शेतकऱ्यांना देण्यासाठी शासनाने रक्कम संबंधित विभागाकडे दिली असल्याचे हे शेतकरी सांगतात. मात्र अजूनपर्यंत केवळ कागदोपत्री भूसंपादन केले असून रस्ता तयार केला. त्याचे डांबरीकरणही केले, पण शेतकऱ्यांकडून संपादित केलेल्या जमिनीचे अद्यापही खरेदीखतच केले नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे तीन वर्षे ओलांडूनही त्यांना संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला मिळालेला नाही.त्यामुळे शुक्रवारी येथील संतप्त बाधित शेतकऱ्यांनी त्यांच्या हद्दीतून जाणाऱ्या रस्त्यावर ट्रॅक्टरने चर मारून काही काळासाठी हा रस्ता वहातुकीसाठी बंद करून एक प्रकारे इशाराच दिला. लवकरात लवकर संपादित जमिनीचे खरेदीखत करून व्याजासह संपूर्ण रक्कम मिळावी अन्यथा कायमस्वरूपी हा रस्ता बंद करून जमीन पुन्हा वहिवटण्यासाठी ताब्यात घेणार असा इशारा यावेळी या शेतकऱ्यांनी दिला आहे. 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाSatara areaसातारा परिसर