शहरं
Join us  
Trending Stories
1
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
2
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
3
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
4
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
5
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
6
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
7
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
8
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
9
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
10
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
11
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
12
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
13
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
14
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
15
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
16
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
17
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
18
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
19
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
20
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
Daily Top 2Weekly Top 5

धनंजयराव गाडगीळ महाविद्यालयात रस्ते सुरक्षा कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:19 IST

सातारा : जिल्हा विधि सेवा प्राधिकरण, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, वाहतूक नियंत्रण शाखा व धनंजयराव गाडगीळ महाविद्यालय यांच्या ...

सातारा : जिल्हा विधि सेवा प्राधिकरण, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, वाहतूक नियंत्रण शाखा व धनंजयराव गाडगीळ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाच्या सभागृहात रस्ते सुरक्षा आणि अपघात जागरूकता कार्यक्रम साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमास जिल्हा न्यायाधीश-२ बी.एस. वावरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुरव, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. प्रतिभा गाकयवाड यांच्यासह विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.

यावेळी जिल्हा न्यायाधीश-२ बी.एस. वावरे यांनी अपघातानंतर होणारी न्यायालयीन कारवाई, तसेच द्यावी लागणारी नुकसान भरपाई व कायद्याचे उल्लंघन केल्याने होणारी शिक्षा व त्याचे परिणाम या‍विषयी मार्गदर्शन केले.

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी सुरक्षेविषयी घ्यावयाची काळजी, रस्ते नियमांचे पालन व त्याचे परिणाम याविषयी माहिती दिली. तर सहा. पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुरव यांनी चित्रफीत आणि पीपीटी दाखवून वाहन चालविण्याबाबतच्या नियमांची माहिती दिली.