शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
3
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
4
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
5
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
6
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
7
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
8
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
9
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
10
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
11
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
12
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
13
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
14
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
15
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
16
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
17
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
18
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
20
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
Daily Top 2Weekly Top 5

Satara: शाळेत सोडतो म्हणून घेवून गेला अन् सात वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार केला; एकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 14:05 IST

डॉक्टरांनी विश्वासात घेऊन चिमुकलीला विचारले अन् समोर आला धक्कादायक प्रकार

मायणी : खटाव तालुक्यातील एका गावातील इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या सात वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती वडूज पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी दिली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिमुकलीची आई २० सप्टेंबर रोजी मुलीला शाळेत सोडण्यासाठी उभी राहिली होती. त्यावेळी ओळखीचा एक व्यक्ती पाठीमागून गाडीवरून आला. त्यावेळी तो चिमुकलीच्या आईला म्हणाला, मी मुलीला शाळेत सोडतो असे म्हणून तिला गाडीवर बसवून घेऊन गेला. साडेअकराच्या सुमारास आईने शाळेत मुलगी आली का याची चौकशी केली असता शिक्षकांनी मुलगी आल्याचे सांगितले.तद्नंतर शाळा सुटल्यानंतर चिमुकली घरी जात असताना हात पाय दुखतात मला उचलून घे, असे म्हटल्यानंतर आईने तिला उचलून घेतले व घरी आल्यानंतर घरातीलच असलेल्या औषध गोळ्या दिल्या मात्र दुसऱ्या दिवशीही अंग पाय दुखतंय अशी चिमुकली म्हणू लागली. तिला एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी घेऊन गेल्यानंतर डॉक्टरांनी विश्वासात घेऊन चिमुकलीला विचारले. त्यावेळी तिने त्या व्यक्तीने मला शाळेत जाताना ओढ्याकडेला शेतात नेऊन गैरप्रकार केला. तसेच मला मारहाण केली व शाळेत पाठवले असा घडलेला प्रकार तिने सांगितला. या प्रकारानंतर चिमुकलीच्या आईने व नातेवाइकांनी वडूज पोलिस ठाण्यामध्ये संबंधित व्यक्तीविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी संबंधित व्यक्तीला तत्काळ अटक केली. पोलिस उपनिरीक्षक वाघमारे व हवालदार नानासो कारंडे हे अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस