शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 21:50 IST

कमाल तापमानात अंशत: घट झाली असली तरी तीन जिल्हे ४६ व तीन जिल्हे ४५ अंशाने तापले आहेत. पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यात मात्र अवकाळीचे सावट तयार झाले असून पारा १ ते ३ अंशाने घसरला आहे.

नागपूर : रविवारी सर्वाधिक तापमानाच्या भीषण उष्णतेने हाेरपळणाऱ्या विदर्भातील सहा जिल्ह्यांचा ताप साेमवारीही कायम हाेता. कमाल तापमानात अंशत: घट झाली असली तरी तीन जिल्हे ४६ व तीन जिल्हे ४५ अंशाने तापले आहेत. पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यात मात्र अवकाळीचे सावट तयार झाले असून पारा १ ते ३ अंशाने घसरला आहे.रविवारी ४६.९ अंशावर गेलेल्या अकाेल्याच्या तापमानात ०.६ अंशाची घट हाेत साेमवारी ४६.३ अंशाची नाेंद झाली. दुसऱ्या क्रमांकावर असलेले अमरावती तापमान अंशत: घटूनही सर्वाधिक उष्ण शहर म्हणून पहिल्या क्रमांकावर आले. येथे ४६.६ अंशाची नाेंद झाली. वर्धा शहराने आज ०.१ अंशाची वाढ नाेंदवत १०० वर्षाचा विक्रम माेडित काढला. साेमवारी वर्ध्याचे तापमान ४६.५ अंश नाेंदविण्यात आले, जे १९९६ सालच्या तुलनेत ०.१ अंशाने अधिक आहे. चंद्रपूरचे तापमान ०.२ अंशाने वाढून ४५.२ वर गेले, तर यवतमाळचे ०.८ अंशाने घटून ४५.२ अंशावर आले. नागपूरला ४५ अंशाची नाेंद झाली. नागपूर शहराच्या काही भागात रविवारी हलक्या सरी झाल्या व साेमवारी सायंकाळी ढगांनी गडगडाट केला. मात्र उष्णता कमी करण्यास त्याचा लाभ झाला नाही.दुसरीकडे पूर्व विदर्भातील गडचिराेली, गाेंदिया आणि भंडारा जिल्ह्यात आकाशात अवकाळी पावसाचे ढग जमा झाले आहे. या तिन्ही जिल्ह्यात पारा खाली आला आहे. गडचिराेली १.४ अंशाने घटून ४३.२ वर, भंडारा २ अंशाने घटून ४२ वर आणि गाेंदिया येथे ३.४ अंशाची घसरण हाेत पारा ४१ अंशावर खाली आला आहे. वाशिम ४४.४ व बुलढाणा ४३.६ अंशावर तापले आहे.२८ नंतरच दिलासाहवामान विभागाच्या अंदाजानुसार विदर्भातील सहा जिल्ह्यात आणखी २४ तास उष्णतेची लाट कायम राहणार आहे. त्यानंतर ३० एप्रिलपर्यंत अवकाळी पावसाचे वातावरण तयार हाेऊन वादळासह हलका पाऊस हाेण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यावेळी विजांचा कडकडाट हाेण्याचीही शक्यता असून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Vidarbha Sizzles, Heatwave Persists; Rain Looms, Relief Expected Soon

Web Summary : Vidarbha's heatwave continues, with Akola, Amravati, and Wardha recording high temperatures. Eastern districts anticipate rain, offering respite. Relief expected after April 28th.
टॅग्स :Vidarbhaविदर्भAmravatiअमरावतीAkolaअकोला