अग्निशामक दलाच्या जवानांना राखी बांधून रक्षाबंधन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:42 IST2021-08-23T04:42:08+5:302021-08-23T04:42:08+5:30

मसूर : आत्मसंयम, त्यागाचे प्रतीक असलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला. यावेळी जवानांच्या सेवेबद्दल ...

Rakshabandhan celebrated by tying rakhi to firefighters | अग्निशामक दलाच्या जवानांना राखी बांधून रक्षाबंधन साजरा

अग्निशामक दलाच्या जवानांना राखी बांधून रक्षाबंधन साजरा

मसूर : आत्मसंयम, त्यागाचे प्रतीक असलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला. यावेळी जवानांच्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

पश्चिम महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या सरचिटणीस संगीता साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीने कऱ्हाड नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाच्या जवानांना राखी बांधून कृतज्ञता व्यक्त केली. हा उपक्रम खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली व महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आला.

जनसामान्यांच्या रक्षणार्थ अहोरात्र स्वतःच्या जिवाची पर्वा न करता बंधू रूपात अग्निशमन दलाचे जवान कार्यरत असतात म्हणून कऱ्हाड येथे या भावांना राखी बांधून कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी मनीषा साळुंखे, प्रांजली साळुंखे, दीपाली सुहास साळुंखे, दीपाली सुनील साळुंखे, मीना विश्वास साळुंखे, अग्निशामक दलाचे अधिकारी लिडिंग फायरमन विनोद काटरे, संजय अडसूळ, विक्रम जाधव, सतीश पवार, सुजित साळुंखे, अविनाश फडतरे, गणेश शेजवळ उपस्थित होते.

Web Title: Rakshabandhan celebrated by tying rakhi to firefighters