शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना सेंटरच्या बाहेर पुन्हा टपऱ्यांची रांग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : साताऱ्यातील मध्यवर्ती बसस्थानकालगत असलेल्या जम्बो कोरोना सेंटरच्या आवारात पुन्हा एकदा खाद्यपदार्थांच्या गाड्या व ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : साताऱ्यातील मध्यवर्ती बसस्थानकालगत असलेल्या जम्बो कोरोना सेंटरच्या आवारात पुन्हा एकदा खाद्यपदार्थांच्या गाड्या व टपऱ्यांची रांग वाढू लागली आहे. पालिका प्रशासनाने कारवाई करूनही येथील विक्रेत्यांना कोरोनाचे तूसभरही गांभीर्य नसल्याचे येथील गर्दीवरून दिसून येत आहे.

सातारा जिल्ह्यात गतवर्षी कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागल्याने उपचारासाठी रुग्णालयाची कमतरता भासू लागली. त्यामुळे राज्य शासनाने साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाच्या इमारतीत सर्व सेवा सुविधांनी युक्त असे जम्बो कोरोना सेंटर सुरू केले. गतवर्षी हे सेंटर सुरू झाल्यानंतर पालिका प्रशासनाकडून संग्रहालयाच्या आवारातील सर्व टपर्‍या व हातगाड्या हटविण्यात आल्या. मात्र काही दिवसांतच परिस्थिती पुन्हा ‘जैसे थे’ झाली.

कोरोना सेंटरपासून केवळ शंभर मीटर अंतरावरच खाद्यपदार्थांच्या गाड्या व टपऱ्यांची रांग वाढू लागली आहे. शेजारी बसस्थानक असल्याने या हातगाड्यांवर प्रवाशांची सतत वर्दळ सुरू असते. या गर्दीतून वाट काढत रुग्णवाहिकेला कोरोना सेंटरपर्यंत जावे लागते.

कोरोना सेंटर हाकेच्या अंतरावर असून, सुद्धा येथील हातगाडीधारक, टपरी चालक व नागरिकांना याचे गांभीर्य नसल्याचे दिसून येते. विक्रेत्यांकडून फिजिकल डिस्टन्सचे पालन केले जात नाही. मास्कचा वापर करणाऱ्यांची संख्याही जेमतेमच आहे. हातगाड्यांची वाढती रांग व येथे होणारी गर्दी धोक्याची-घंटा देऊ लागली आहे. परिस्थिती गंभीर होण्यापूर्वी पालिकेच्या अतिक्रमण विभागाने येथील टपऱ्या इतरत्र स्थलांतरित करणे गरजेचे बनले आहे.

फोटो : मेल

साताऱ्यातील जम्बो कोरोना सेंटरच्या आवारात खाद्यपदार्थांच्या गाड्या व त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. (छाया : जावेद खान)