शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
4
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
5
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
6
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
7
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
8
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
9
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
10
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
11
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
12
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
13
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
14
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
15
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
16
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
17
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
18
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
19
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
20
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
Daily Top 2Weekly Top 5

भ्रष्टाचारी नेत्यांना जेलमध्ये टाका

By admin | Updated: March 20, 2016 23:48 IST

उदयनराजे : अजित पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा; राष्ट्रवादीला घरचा आहेर

सातारा : ‘राज्यात विविध क्षेत्रांमध्ये भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस येत आहेत. अद्यापही काही नेते भ्रष्टाचार करून नामानिराळे राहिले आहेत. त्यांनाही पहिल्यांदा जेलमध्ये टाका,’ अशी मागणी करत खासदार उदयनराजे भोसले यांनी नाव न घेता माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधत राष्ट्रवादीला घरचा आहेर दिला.सातारा येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. खासदार उदयनराजे म्हणाले, ‘जलजागृती सप्ताहामध्ये बऱ्याच ठिकाणी लोकप्रतिनिधींचा सहभाग दिसून आला नाही. अशा लोकप्रतिनिधींना लोकांच्या रोषास आता सामोरे जावे लागणार आहे. पूर्वी ‘पाणी आडवा पाणी जिरवा,’ अशी घोषणा होती; मात्र आता ‘लोकांना आडवा, लोकांची जिरवा,’ अशी घोषणा रूढ होत आहे. भ्रष्टाचार झाल्यामुळे धरणे अपूर्ण राहिली. धरणे पूर्ण झाली असती तर दुष्काळी भागाला पाणी तरी मिळाले असते. त्यामुळे भ्रष्टाचारी लोकप्रतिनिधींना शासन झालेच पाहिजे. शेतकऱ्यांची ज्यांनी ही अवस्था केली, त्यांना तुरुंगात टाकले पाहिजे. सर्वच क्षेत्रांत भ्रष्टाचार बोकाळत आहे. याला सर्वस्वी नेतेच जबाबदार आहेत. त्यामुळे भ्रष्टाचारी नेत्यांना पहिल्यांदा जेलमध्ये टाका. लोकप्रतिनिधींवर लोकांचा अंकुश पाहिजे. तरच विकास होईल.’छगन भुजबळ यांना भेटण्यासाठी तुमच्या पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे या कारागृहात गेल्या होत्या. भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या नेत्याला मग तुमचाही पाठिंबा आहे का? असा प्रश्न खा. उदयनराजे यांना विचारण्यात आला. यावर उदयनराजे म्हणाले, ‘इथे पक्षविरहित भूमिका मांडली पाहिजे. जर भुजबळ यांनी भ्रष्टाचार केला असेल, तर त्यांना शासन होणे गरजेचे आहे. त्यामध्ये मीही असलो तरी मलाही शासन झालेच पाहिजे. अन्य लोकप्रतिनिधी असतील त्यांनाही आता कारागृहात गेलेच पाहिजे; अन्यथा महाराष्ट्रातील लोक जनआंदोलन उभारतील. याला मी मात्र निमित्त असेन,’ असाही इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला. (प्रतिनिधी)