शहरं
Join us  
Trending Stories
1
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
2
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
3
Top Marathi News LIVE Updates: सोलापूर शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं धावपळ
4
“NEET पेपर लीक करणारे मोकाट, सरकारला एक परीक्षाही घेता येत नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
5
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय! आपल्या खास ज्योतिष्याला बनवलं थेट 'OSD'
6
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
7
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
8
मूर्ती लहान, कीर्ती महान! ३ वर्षे ११ महिन्यांच्या जान्हवी सोनीची कमाल; नावावर ३ इंटरनॅशनल रेकॉर्ड
9
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
10
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
11
सोनं खरेदी करू नका, असं आवाहन इंदिरा गांधींनी खरंच केलं होतं का?; व्हायरल कात्रणामागचं सत्य काय?
12
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
13
Travel : भारताच्या 'मिनी थायलंड'पासून अवघ्या ३ तासांवर आहे 'हे' सुंदर ठिकाण; निसर्गात रमून थकवा विसराल!
14
‘सनातन धर्माला संपवलंच पाहिजे’, विजय यांच्यासमोर उदयनिधींचं विधान, मुख्यमंत्र्यांनी दिला असा प्रतिसाद
15
कल्याणमध्ये ७८ वर्षीय भोंदूबाबाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
16
NEET Exam Paper Leak : "पप्पा, हाच पेपर येईल, हॉस्टेलमधील मुलींना द्या"; NEET चं केरळ कनेक्शन, १८० पैकी १३० प्रश्न लीक
17
कान्समध्ये अवतरली जणू स्वप्नातील परी! मिंट-ग्रीन गाऊनमध्ये आलिया भट्टचा 'प्रिन्सेस लूक' व्हायरल
18
Vastu Shastra: घरात पैसे टिकत नाहीत? मग चुकूनही 'या' दिशेला ठेवू नका तुमची तिजोरी!
19
सीजफायरचा फक्त देखावा! इराणने रशिया-चीनकडून जमवला शस्त्रास्त्रांचा डोंगर; 'या' देशांना दिला इशारा
20
ज्याने कपाटात 'सीक्रेट' कप्पा बनवला, त्यानेच हात साफ केला! ३० लाखांची चोरी करून कारागिर फरार
Daily Top 2Weekly Top 5

जनमानसातील एस.टी. ची प्रतिमा उंचावूया!

By admin | Updated: December 1, 2014 00:23 IST

प्रतापसिंह सावंत : वडूज आगाराच्या कर्मचाऱ्यांशी साधला संवाद


वडूज : ‘संस्थेच्या हितासाठी काम करणे माझे कर्तव्य आहे. कारण ही संस्था माझे व माझ्या कुटुंबाचे हीत जोपासते. प्रसंगी निर्माण होणारे प्रश्न समोपचाराने सोडविले तर हा वडूज आगार सुस्थितीत चालेल. तसेच प्रवाशांना चांगली सेवा देऊन जनमानसातील एस.टी. ची. प्रतिमा उंचावूया,’ असे भावनिक आव्हान प्रादेशिक व्यवस्थापक प्रतापसिंह सावंत यांनी केले.
येथील आगारामध्ये चालक, वाहक, मेकॅनिक, व कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी आगारप्रमुख आलेकरी, के. टी. पाटील, संजय गुजर, सुनील मदने, अप्पासाहेब यादव, शिवाजी देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.
सावंत म्हणाले, ‘वर्षातून एकदाच गॅरेजला जाणारी खासगी वाहने व्यवस्थित असतात. मात्र, आपली एस. टी. बस दररोज वर्कशॉपला येऊनही तिची दुरवस्था का? कारण कमतरता काय तर इच्छाशक्तीचा अभाव दिसून येतो. पैसे देऊन प्रवाशांनी एस. टी. बसमध्ये का बसावे? त्यासाठी आता मला हे बदलावयाचे आहे. या स्वच्छ भावनेतूनच नवीन उभारी घेऊन काम करूया, अशी वास्तव भूमिका मांडली. घराला शिस्त लावताना काही वेळा कटू निर्णय घ्यावे लागतात. पगारापुरते काम करून चालणार नाही. कारण शासनाचे टप्पा वाहतूक सुरू करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. एस. टी. ची. प्रतिमा उंचाविली तर अप्रत्यक्ष फायदा आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये होत असतो.’
दरम्यान, प्रादेशिक व्यवस्थापक सावंत यांनी वडूज आगारामध्ये वर्कशॉप व गाड्यांची तपासणी केली. त्यानंतर चालक, वाहक मेकॅनिक व कर्मचाऱ्यांशी त्यांनी सविस्तर चर्चा करून अडीअडचणी समजून घेतल्या. याप्रसंगी मनसे संघटना व कामगार संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार केला.
चालक अप्पासाहेब यादव यांनी शिस्त, स्वच्छता व काम हा त्रिसूत्री कार्यक्रम राबविला तर हा डेपो निश्चितच नफ्यात येईल, असा मानस व्यक्त केला. तर कामगार संघटनेचे सुनील मदने यांनी बसेसमध्ये साठच्या वेगाला लॉक केल्यामुळे डिझेल बचत करताना अडचणी येत असल्याचे स्पष्ट केले. याप्रसंगी भरत राऊत, राजेंद्र जाधव, डी. टी. जाधव, संदीपान देशमुख आदींसह चालक, वाहक, मेकॅनिक व कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

खाऊन माजा; पण टाकून माजू नका
आगारातील प्रत्येक गाडीचे आॅईल गळती पाहून सावंत यांनी प्रापंचिक उदाहरण देताना म्हणाले, ‘घरातील महिला गोडतेलाचा वापर करताना त्या भांड्याला बोट लावून तो तेलाचा थेंब पुन्हा भांड्यात टाकते, कारण तिला प्रपंच करायचा असतो. तसेच आपण ही आपल्यात बदल केला पाहिजे.
सद्य:स्थितीतील व प्रापंचिक उदाहरणांचे दाखले देऊन सावंत यांनी वास्तव भूमिकेचे स्पष्टीकरण दिले. यामध्ये त्यांनी चौफेर टोलेबाजी करत उपस्थित कर्मचाऱ्यांची मने जिंकली. तसेच काम करणाऱ्यांची पाठ थोपटा व काम न करणाऱ्याला रपाटा (शाब्दिक) द्या, असे म्हणताच हास्यकल्लोळ झाला.