शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्त्यावर नमाज पठण चालणार नाही, प्रेमाने सांगून ऐकलं नाही तर..."; मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा इशारा 
2
महिलांना दरमहा ३००० रुपये, मोफत बस प्रवास अन्...! सुवेंदू सरकार ॲक्शन मोडवर, १ जूनपासून खात्यात जमा होणार पैसे
3
Twisha Sharma : "हनिमूनलाच समर्थने माझ्या मुलीला..."; ट्विशाच्या वडिलांनी ढसाढसा रडत सांगितले जावयाचे कारनामे
4
‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील
5
“ST ही ग्रामीण भागासाठी अत्यावश्यक सेवा, तत्काळ भाडेवाढ करणार नाही, पण...”: प्रताप सरनाईक
6
"मराठी वारशाची शान घेऊन...", कान्स रेड कार्पेट गाजवल्यानंतर अशोक सराफ यांची पोस्ट
7
IND vs AFG Test: जसप्रीत बुमराह OUT; रणजी गाजवणाऱ्या Auqib Nabi Dar साठी उघडणार टीम इंडियाचा दरवाजा?
8
Top Marathi News LIVE: लाडक्या बहिणींना ३००० रुपये, मोफत बस सेवा; पश्चिम बंगाल सरकारने घेतले मोठे निर्णय 
9
Twisha Sharma : Video - "माझी मुलगी शूर होती, सासरचे..."; ट्विशाच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
10
एकच सामना, एक SMS अन् IPL चा प्रवास संपला... बांगलादेशी क्रिकेटपटूने सांगितली दुःखद कहाणी
11
स्मार्टफोनमुळे कमी होतोय जन्मदर, रिलेशनशिप होत आहे अवघड; माणसाच्या आयुष्यावर मोठा परिणाम, नव्या संशोधनात काय?
12
बहिणीकडे राहून शिक्षण ते १०० कोटींचे साम्राज्य...; मोटेगावकर सरांना 'त्या' १०१ प्रश्नांच्या व्हिडिओनेच अडकवले
13
Adhik Maas 2026: 33 अंकाचे रहस्य; अधिक मासात का मानतात ३३ आकडा खास, काय आहे कनेक्शन?
14
भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनची झलक आली समोर; जपानच्या तंत्रज्ञानाने सज्ज; काय आहेत वैशिष्ट्ये?
15
दगडफेक केली, AC तोडले... लोकांच्या संतापाचा उद्रेक; गरिबांचे पैसे हडपल्याचा सरपंचावर आरोप
16
प्रेमानंद महाराजांची तब्येत बिघडली, पहाटेची पदयात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित, भाविकांना दर्शन मिळणार नाही
17
अधिक मास विनायक चतुर्थीला अंगारक योग २०२६: ‘हे’ प्रभावी मंत्र-स्तोत्र म्हणा, संकटमुक्त व्हा!
18
Adhik Maas 2026: विनायक चतुर्थीला अंगारक योग, ‘असे’ करा गणपती व्रत पूजन; दुपटीने शुभ-लाभ!
19
ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली असती तर TMC ला किती जागा मिळाल्या असत्या? आकडे बघून थक्क व्हाल
20
जेव्हा सापाने खलनायकाच्या जिभेलाच दंश केला! शूटिंग सेटवर क्षणात पसरला 'सन्नाटा'; असा घडला होता थरार 
Daily Top 2Weekly Top 5

महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी बलात्काराचा आरोप असलेला PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 00:05 IST

फलटण येथे महिला डॉक्टरने गुरुवारी रात्री एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

सातारा -  फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरवर अत्याचाराचा आरोप असलेला पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदने हे शनिवारी रात्री स्वतःहून रिक्षाने येऊन फलटण शहर पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री हजर झाला. यावेळी फलटण शहर पोलिस ठाण्यासमोर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

फलटण येथे महिला डॉक्टरने गुरुवारी रात्री एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. संबंधित डॉक्टर महिलेने आपल्या हातावर पीएसआय गोपाळ बदने याने चार वेळा अत्याचार केल्याचे तर प्रशांत बनकर याने मानसिक छळ केल्याचे लिहिले होते. या प्रकरणानंतर संपूर्ण राज्यात प्रचंड खळबळ उडाली. आरोपी पीएसआय बदने हा या घटनेनंतर फलटणमधून पसार झाला होता. त्याच्या शोधासाठी फलटण पोलिस व सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे दोन पथके बीड, पुणे, पंढरपूर आधी ठिकाणी रवाना केली होती. शुक्रवारी दिवस आणि रात्र पोलिसांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तो सापडला नाही. 

दरम्यान, शनिवारी रात्री उशिरा गोपाळ बदने हा फलटण शहर पोलिस ठाण्यात हजर झाला. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या अटकेची कारवाई सुरू केली. बदने पोलिस ठाण्यात हजर झाल्याचे समजतात फलटणमधील नागरिकांनी पोलिस ठाण्याकडे धाव घेतली. या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी तातडीने बंदोबस्त तैनात केला. 
 
दोन दिवस कोणी मदत केली का ?

दोन दिवस तो नेमका कुठे कुठे फिरला. त्याला कोणी कोणी मदत केली. याची सारी माहिती पोलिस त्याच्याकडून घेत आहेत. आता पीएसआय बदने याच्या चौकशीतून या प्रकरणातील आणखी वस्तुस्थिती समोर येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्या आधीच पत्करली शरणागती...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रविवारी फलटण येथे विविध विकास कामांच्या उद्घाटनाच्या निमित्ताने येत आहेत. तर दुसरीकडे पीएसआय बदने हा फरार होता. त्यामुळे पोलिसांवर प्रचंड दबाव आणि तणाव होता. मात्र बदने हा स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाल्याने पोलिसांनीही सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Accused PSI in Doctor Suicide Case Surrenders to Police

Web Summary : PSI Gopal Badne, accused of rape in the doctor suicide case, surrendered to Falton police. The doctor alleged rape and harassment in a note. Police are investigating who aided Badne during his absconding period. The surrender occurred before the Chief Minister's visit.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी