शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
2
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
3
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
4
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
5
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
6
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
7
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
8
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
9
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
10
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
11
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
12
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
13
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
14
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
15
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
16
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
17
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
18
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
19
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
20
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
Daily Top 2Weekly Top 5

बचत गटाच्या नावाखाली खासगी सावकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 16:29 IST

Crime News Satara Police- मलकापूर शहरातील काही बचत गटांच्या नावाखाली महिलांकडून खासगी सावकारी केली जात आहे. गरजू महिलांकडून पंधरा ते वीस टक्क्याने व्याज वसूल केले जात असून प्रसंगी दमदाटीही केली जात आहे. दरम्यान पोलिसांनी खासगी सावकारांविरोधात कारवाई सुरू केल्यामुळे मलकापुरातील पिडीत महिलाही पोलिसांना निवेदन देण्याच्या तयारीत आहेत. पोलिसांनीही या प्रकाराची दखल घेत बचत गटाच्या नावाखाली सावकारी करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्याची गरज आहे.

ठळक मुद्देबचत गटाच्या नावाखाली खासगी सावकारी मलकापुरातील प्रकार : महिलाच महिलांकडून उकळतायत व्याज

मलकापूर : शहरातील काही बचत गटांच्या नावाखाली महिलांकडून खासगी सावकारी केली जात आहे. गरजू महिलांकडून पंधरा ते वीस टक्क्याने व्याज वसूल केले जात असून प्रसंगी दमदाटीही केली जात आहे. दरम्यान पोलिसांनी खासगी सावकारांविरोधात कारवाई सुरू केल्यामुळे मलकापुरातील पिडीत महिलाही पोलिसांना निवेदन देण्याच्या तयारीत आहेत. पोलिसांनीही या प्रकाराची दखल घेत बचत गटाच्या नावाखाली सावकारी करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्याची गरज आहे.महिला सक्षमीकरणासाठी बचत गट स्थापन करण्यात आले. काही बचत गटांनी प्रत्यक्षात महिलांच्या सक्षमीकरणाचे प्रयत्न केले. मात्र मलकापूर शहराची व्याप्ती वाढली असून शहरात गेल्या दहा वर्षात बचत गटांची संख्याही वाढली आहे. बचत गट सक्षम करण्यासाठी पालिकेकडूनही सहाय्य मिळते.

समाजातील काही गरीब, कष्टकरी महिलांच्या आयुष्यात काही बचत गटांनी सक्षमता आणली, हे खरे आहे. मात्र, काही बचत गटांच्या नावाखाली खासगी सावकारी सुरू आहे. अडाणी, गरजू महिलांना बचत गटाचे पैसे द्यायचे. आणि त्याबदल्यात पंधरा, वीस, पंचवीस टक्के व्याज उकळायचे, असा उद्योग सुरू आहे.आगाशिवनगर भागातील काही बचत गटांनीही खासगी सावकारी सुरू केली असून काही शिक्षक कुटूंबातील महिलाही यामध्ये सहभागी असल्याची चर्चा आहे. ज्या महिलांनी अडचणीला पैसे घेतले त्यांच्या घरी जाऊन गोंधळ घालणे, साहित्य उचलून नेणे, गुंड पाठवण्याची धमकी देऊन पैसे उकळण्याचा प्रयत्न सुरू आहे. विशेष म्हणजे या बचत गटाच्या आडून काही महिलांचा सक्रीय सहभाग असल्याने खासगी सावकारीत महिलांनीही जोर धरला आहे.तक्रार द्या, कारवाई करू!पोलिसांनी खासगी सावकारीप्रकरणी कºहाडातील एकाला नुकतीच अटक केली. या पार्श्वभुमीवर मलकापूर, आगाशिवनगर भागात खासगी सावकारीचे आणि दमदाटीचे उद्योग कोण करत असेल तर तक्रार द्या. कडक कारवाई करू, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरिक्षक बी. आर. पाटील, सहाय्यक पोलीस निरिक्षक विजय गोडसे यांनी केले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसरPoliceपोलिस