शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

प्राथमिक शिक्षक संघाची शकले!

By admin | Updated: November 28, 2015 00:23 IST

खंडाळा तालुका : दोन स्वतंत्र गट, तात्त्विक मतभेदाचे कारण

खंडाळा : खंडाळा तालुका हा प्राथमिक शिक्षक संघाचा बालेकिल्ला मानला जात होता. या ठिकाणी शिक्षकांची अभेद्य ताकद होती. त्यामुळे जिल्ह्यासह निवडणुकीत तात्विक विचारांचे मतभेद होऊन संघाचे तालुक्यात दोन शकले झाली आहेत. अभेद्य शिक्षक संघात फूट पडून दोन स्वतंत्र संघटना अस्तित्त्वात आल्या आहेत. त्यामुळे तालुक्याच्या इतिहासात आता शिक्षकांच्या संघटना पातळीवरील राजकारणाचा नवा संघर्ष पाहायला मिळणार आहे.खंडाळा तालुक्यातील सर्व शिक्षक हे संघाचे नेते संभाजीराव थोरात यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघात काम करीत होते. या संघटनेच्या बळावर अनेक समस्यांचे निराकरण करण्यातही यश मिळविले होते. चार महिन्यांपूर्वी पार पडलेल्या सातारा शिक्षक बँकेच्या निवडणुकीत उमेदवार निवडीवरून संघटनेत ठिणगी पडली आणि त्याचा वणवा संघटना विभागणीपर्यंत पसरला. पूर्वाश्रमीच्या पुरोगामी शिक्षक संघाने तालुका संघटनेवर चालवलेले वर्चस्व, मूळच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांना मिळणारी दुय्यम वागणूक, तालुक्यातील शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न आणि संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचा वेळकाढूपणा या सर्व बाबींवर नाराज होऊन बँकेचे माजी संचालक मच्छिंद्र ढमाळ यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक संघटनेचे माजी आमदार शिवाजीराव पाटील गटात काम करण्याचा निर्णय घेऊन तालुका पातळीवर नवी संघटना उभी राहात आहे.खंडाळा तालुक्याची शिक्षक संघटना एकसंध राहावी, यासाठी या संघटनेचे माजी अध्यक्ष बबनराव ठोंबरे, चंद्रकांत यादव, नवनाथ भरगुडे यांनी अनेक वर्षे काम केले. त्यानुसार संघटना पातळीवर उठावदारपणे कामही झाले. मात्र संघटनेच्या निर्णयात इतरांना विचारात न घेणे, लोकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणे या बाबी विशेषत: पुरोगामी शिक्षक संघटनेच्या शिक्षकांचा वाढता प्रभाव या गोष्टींमुळे स्वाभिमानी शिक्षकांनी स्वतंत्र संघटनेत काम करण्याचा निर्णय घेतला आहे.शिक्षक बँकेचे माजी संचालक मच्छिंद्र ढमाळ, नानासाहेब शेडगे, नवनाथ क्षीरसागर, सुधीर भोसले, राजेश जगताप, विद्याधर क्षीरसागर, नानासो कानडे, दशरथ धायगुडे, संदीप राऊत, रामदास सोळसकर या शिक्षकांच्या नेतृत्वाखाली आमदार शिवाजीराव पाटील प्रणित नवी संघटना उभी राहात आहे. रविवार, दि. २९ रोजी या नव्या संघटनेचे जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय अधिवेशन आमदार मकरंद पाटील व माजी आमदार शिवाजीराव पाटील यांच्या उपस्थितीत पार पडत आहे. त्यामुळे शिक्षक संघाच्या दोन पलटणी निर्माण होणार, हे निश्चित झाले आहे. तर शिक्षक नेते संभाजीराव गटाची धुरा नूतन अध्यक्ष पी. जी. भरगुडे, कार्यकारी अध्यक्ष भानुदास राऊत, दत्तात्रय महांगरे यांनी सांभाळली आहे. (प्रतिनिधी)अधिवेशनाच्या उपस्थितीकडे लक्ष शिक्षक बँकेच्या निवडणुकीत संघटनेचे उमेदवार म्हणून भगवान धायगुडे यांनी निवडणूक लढविली होती. तर त्यांच्या विरोधात मूळ संघटनेवर अन्याय झाल्याची भावना व्यक्त करीत नानासाहेब शेडगे यांनी लढत दिली होती. यात धायगुडे यांना २७४ मते तर शेडगे यांना १८१ मते मिळाली होती. संघटनेत प्रथमच एवढी विभागणी झाली. त्यामुळे अधिवेशनाला कितीजण उपस्थित राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.