रायगावजवळ अपघातात पोलिसाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 12:57 IST2021-03-27T10:52:40+5:302021-03-27T12:57:20+5:30

Accident police Satara- सातारा जिल्हा पोलिस दलातील व सध्या वाई पोलिस उपविभागीय कार्यालयात कर्तव्य बजावत असलेले पोलिस कर्मचारी संग्राम शिर्के (वय २६, मूळ रा. किडगाव ता. सातारा) यांचा शुक्रवार रात्री अपघातात दुर्देवी मृत्यू झाला. ते गंभीर जखमी झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतू उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

Policeman killed in accident near Raigaon | रायगावजवळ अपघातात पोलिसाचा मृत्यू

रायगावजवळ अपघातात पोलिसाचा मृत्यू

ठळक मुद्देरायगावजवळ अपघातात पोलिसाचा मृत्यूवडिलांनी भुईंज पोलिस ठाण्यात दिली तक्रार

सातारा-जिल्हा पोलिस दलातील व सध्या वाई पोलिस उपविभागीय कार्यालयात कर्तव्य बजावत असलेले पोलिस कर्मचारी संग्राम शिर्के (वय २६, मूळ रा. किडगाव ता. सातारा) यांचा शुक्रवार रात्री अपघातात दुर्देवी मृत्यू झाला. ते गंभीर जखमी झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतू उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

गंभीर जखमी अवस्थेत पोलिस संग्राम शिर्के यांना उपचारासाठी साताऱ्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना मात्र शुक्रवार (दि.२६) रात्री त्यांचा मृत्यू झाला. संग्राम शिर्के यांचा मृत्यू झाल्याचे समजताच कुटुंबियांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता.

भुईंज पोलिस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, या घटनेमुळे पोलिस दलावर शोककळा पसरली आहे. रायगाव (ता. जावली) गावचे हद्दीतील पुणे, सातारा महामार्गावर हा अपघात झाला आहे. याप्रकरणी पोलिस संग्राम शिर्के यांच्या वडिलांनी भुईंज पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

Web Title: Policeman killed in accident near Raigaon